सिटी हब मिडिया वणी…
नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतो आहे?”
प्रचारात घरोघरी जाताना नागरिकांकडून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे?
पायल तोडसाम सांगतात—“चालता-चालता एखादी आजी माझा हात धरते आणि म्हणते ‘मुली, तुम्ही प्रामाणिक दिसता’—हे माझ्यासाठी निवडणुकीपेक्षा मोठं बक्षीस आहे. नागरिक विशेषतः महिलांचा प्रतिसाद प्रचंड आहे. त्या म्हणतात प्रलोभने नको, पण लाडकी बहीण योजना, महिला सुरक्षा, आणि मूलभूत सुविधा या गोष्टी आवश्यक आहेत. लोकांकडून मिळत असलेली ही सकारात्मक ऊर्जा आमच्या टीमची सर्वात मोठी ताकद झाली आहे.”
“आमच्या शिवसेनेच्या 29 उमेदवारांसोबत, प्रभागात फिरताना नागरिक स्वतःहून हातात धनुष्यबाण घेऊन उभे राहतात. हा भावनिक प्रतिसाद सांगतो की लोकांना बदल हवा आहे. वणी शहरात विश्वासाची नवीन लाट तयार झाली आहे आणि ती फक्त माझ्यामुळे नाही—तर शिवसेनेच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे,” असे त्या नमूद करतात.

























