सिटी हब मिडिया वणी…
वणीमध्ये महसूलमंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा; भाजपच्या प्रचाराला नवा वेग…
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने वणीमध्ये प्रचाराचा जोर वाढविला असून या प्रचाराला गती देण्यासाठी महाराष्ट्राचे महसूल मंत्री मा. श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांची जाहीर सभा 29 नोव्हेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता शासकीय मैदान, पाण्याची टाकी जवळ येथे ही सभा पार पडणार आहे.
राजकीय जाण आणि प्रभावी नेतृत्व यासाठी ओळखल्या जाणाऱ्या बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमुळे वणीतील निवडणुकीचे वातावरण आणखी रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नगरपरिषद निवडणूक 2025 संदर्भातील महत्त्वाचे विषय, विकासाचा रोडमॅप आणि भाजपचे पुढील धोरण याबाबत ते मार्गदर्शन करतील, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ. विद्या खेमराज उर्फ सचिन आत्राम यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘कमळ’ या चिन्हासाठी मतदारांना आवाहन करत त्यांनी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
वणीतील नागरिकांमध्ये या सभेबाबत उत्सुकता असून बावनकुळे साहेबांच्या भेटीमुळे भाजपचा प्रचार आणखी जोम धरू लागला आहे.

























