Homeमनोरंजन“आश्वासन नाही… कामाची हमी!” — कैलाश बोबडेंच्या प्रचाराला प्रभाग क्रमांक १ मधील...

“आश्वासन नाही… कामाची हमी!” — कैलाश बोबडेंच्या प्रचाराला प्रभाग क्रमांक १ मधील नागरिकांचा मोठा प्रतिसाद!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

प्रभाग क्रमांक १ मध्ये कैलाश बोबडे यांना वाढतं जनसमर्थन; विश्वास नांदेकर व विजय चोरडिया यांच्या प्रभावामुळे प्रचाराला वेग…

प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेचे उमेदवार कैलाश बोबडे हे सध्या प्रचंड चर्चेत असून त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस गती मिळत आहे. “आश्वासन देत नाही… ते पूर्ण करतो,” हा थेट आणि स्पष्ट संदेश देत ते मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करत आहेत.

कैलाश बोबडे केटरिंग व्यवसायात काम करतात आणि त्यामुळे स्थानिकांशी त्यांचा कायमचा संपर्क कायम राहिला आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच वयोगटांमध्ये त्यांची ओळख आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. प्रभागातील विविध समस्या प्रत्यक्ष पाहत त्या सोडवण्यासाठी त्यांनी उचललेल्या पावलांमुळे मतदारांमध्ये त्यांच्या कामाबद्दल सकारात्मक भावना आहे.

मागील नगरसेवकांनी फक्त आपल्या घराच्या शंभर मीटर परिसरातच विकासाची कामे केंद्रित ठेवून उर्वरित प्रभागाला दुय्यम ठरवल्याचा आरोप सध्या मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नाले बांधणी, बगीचा निर्मिती अशा काही निवडक कामांपुरताच विकास थांबला, अशी नाराजी नागरिकांनी वारंवार व्यक्त केली आहे.

याउलट, कैलाश बोबडे स्पष्टपणे आश्वासन देतात —

“मी निवडून आलो तर प्रत्येक नागरिकाचा प्रश्न हा माझा प्राधान्यक्रम असेल. प्रभागातील कोणावरही अन्याय होऊ देणार नाही.”

विश्वास नांदेकरांचे नेतृत्व आणि जनाधार बोबडेंना मिळतोय थेट फायदा

हा प्रभाग माजी आमदार व शिवसेनेचे नेते विश्वास नांदेकर यांचाही असल्याने त्यांचा प्रभाव बोबडेंच्या प्रचाराला अधिक बळ देतो आहे. विश्वास नांदेकर यांचा जनतेशी थेट संपर्क, प्रभागातील लोकांमध्ये असलेली त्यांची लोकप्रियता आणि सक्रियता यामुळे मोठा जनाधार थेट बोबडे यांच्या बाजूला वळताना दिसत आहे.

विजय चोरडिया यांची संघटनशक्ती ठळक; घराघरात पोहोचतंय शिवसेनेचं संदेश

याशिवाय संघटन मंत्री विजय चोरडिया यांनीही गेल्या काही दिवसांत घराघरात जाऊन प्रचाराच्या मोहीमेची मोठी धुरा सांभाळली आहे. त्यांनी संघटना मजबूत करत प्रत्येक कार्यकर्त्याला सक्रिय केले असून त्याचा थेट फायदा बोबडे यांच्या प्रचाराला होत आहे. विजय चोरडिया यांच्या मेहनतीमुळे प्रभागात शिवसेनेची संघटनशक्ती अधिक बळकट झाली आहे.

प्रभागात बदलाची लाट; बोबडे मजबूत आघाडीवर

धडाडीचे, सहज उपलब्ध आणि जनतेच्या प्रश्नांशी भावनिक नाळ जपणारे नेतृत्व म्हणून कैलाश बोबडे प्रभाग क्रमांक एकमध्ये अधिकाधिक लोकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. प्रचारात त्यांच्या समर्थनाची लाट वाढत असून वातावरण स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकताना दिसते.

येणाऱ्या दोन तारखेला ईव्हीएममध्ये नेमका कोणता निर्णय उमटेल ते मतदारच ठरवतील; परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये कैलाश बोबडे प्रभाग क्रमांक एकमधून अग्रस्थानी असल्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत.

तीन डिसेंबरच्या निकालात विजय मिळेल,

असा त्यांना ठाम आत्मविश्वास आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए