सिटी हब मिडिया वणी…
यवतमाळ : विद्यार्थी परिषद निवडणुकीत AISFचा दणदणीत विजय…
यवतमाळ – जिल्हा परिषद (मा. शा.) माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोधनी रोड, यवतमाळ येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (AISF) ने दणदणीत विजय मिळवला. अत्यंत चुरशीच्या लढतीत AISF ने सर्वांचे लक्ष वेधत प्रमुख पदांवर कब्जा केला.
या निवडणुकीत AISF चे कॉम्रेड आर्यन राठोड हे अध्यक्षपदी विजयी झाले, तर कॉम्रेड कु. रोशनी कांबळे या सचिवपदी निवडून आल्या. दोन्ही विजयी पदाधिकारी AISF चे सक्रिय आणि संघर्षशील कार्यकर्ते असून विद्यार्थी प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्यासाठी ओळखले जातात.
निवडीनंतर दोन्ही पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सुविधा, हक्क आणि शैक्षणिक वातावरण सुधारण्यासाठी अविरतपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे, शैक्षणिक सुविधा वाढवणे आणि विद्यार्थी आवाज अधिक प्रभावीपणे मांडणे हे आमचे प्राथमिक ध्येय असेल,” असे त्यांनी सांगितले.
AISFचे जिल्हाप्रमुख कॉ. अथर्व निवडींग यांनी दोन्ही विजयी पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाला भविष्यात उत्तम यश मिळावे, अशा हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ही निवडणूक उत्साहात पार पडताच महाविद्यालयीन परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून AISF च्या विजयाबद्दल विद्यार्थ्यांत उत्सुकता आणि समाधान व्यक्त केले जात आहे.

























