सिटी हब मिडिया वणी…
यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा मतदारसंघाचे माजी शिवसेना आमदार मा. विश्वास नांदेकर हे सध्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांच्या तब्येतीची सविस्तर विचारपूस केली.
यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नांदेकर यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबाबत उपस्थित डॉक्टरांकडून माहिती घेतली. नांदेकर यांच्या कुटुंबीयांचीही त्यांनी भेट घेऊन धीर दिला.
विश्वास नांदेकर हे वणी विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले माजी आमदार असून, त्यांच्या मागे मोठा कार्यकर्ता वर्ग आहे. प्रकृती अस्वस्थ असतानाही ते सक्रिय राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीदरम्यान रुग्णालयातूनच ते सातत्याने निवडणूक प्रक्रियेबाबत माहिती घेत होते तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व सूचना देत होते.
सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत. कुटुंबीय त्यांच्यासोबत रुग्णालयात उपस्थित आहेत. विश्वास नांदेकर लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना व सदिच्छा सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.

























