Homeमहाराष्ट्रवाढदिवस विशेष,यशस्वी व्यवसायिक ते प्रभावी राजकीय नेतृत्व : भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकुश...

वाढदिवस विशेष,यशस्वी व्यवसायिक ते प्रभावी राजकीय नेतृत्व : भाजप जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांचा प्रेरणादायी प्रवास!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

आज भाजपचे युवा नेतृत्व जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष लेख…

भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अंकुश बोढे यांचा प्रवास हा यशस्वी व्यवसायिकापासून प्रभावी आणि तडफदार राजकीय नेतृत्वापर्यंत पोहोचलेला आहे. न्यू अंकुश मोबाईल शॉपीचे संचालक असलेल्या अंकुश बोढे यांनी अल्पावधीतच राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.

त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मनसेच्या शहर अध्यक्षपदापासून झाली. या काळात त्यांनी वणी शहरातील नागरिकांच्या विविध समस्या सातत्याने उचलून धरल्या व त्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. मोकाट जनावरांचा प्रश्न असो वा वाढीव कराचा मुद्दा—अंकुश बोढे यांनी ठोस भूमिका घेत प्रशासनाला कारवाई करण्यास भाग पाडले. एका वेळी तर मोकाट ढोरांचा प्रश्न गंभीरतेने मांडण्यासाठी ढोर नगरपालिकेच्या आवारात नेऊन सोडत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.

यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर अंकुश बोढे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. स्वतः भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी त्यांचा पक्षप्रवेश करून घेतला व त्यांची भाजप जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीनंतर वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली—प्रभाग क्रमांक ११ चे प्रभारी म्हणून.

प्रभाग ११ मध्ये भाजपचे उमेदवार लवलेश लाल आणि रेखाताई कोवे निवडणुकीच्या रिंगणात होते. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी अंकुश बोढे यांनी पूर्ण ताकद लावली. गल्लोगल्ली फिरत, घरोघरी प्रचार करत त्यांनी उमेदवारांसोबत पूर्णवेळ काम केले. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि मेहनतीमुळे भाजपने प्रभाग क्रमांक ११ मधील दोन्ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकल्या. या विजयात अंकुश बोढे यांचा वाटा महत्त्वपूर्ण ठरला, हे नाकारता येणार नाही.

आज अंकुश बोढे हे भाजपचे युवा व तडफदार नेतृत्व म्हणून वणीच्या राजकीय पटलावर ओळखले जात आहेत. उत्तम वक्तृत्व, जनतेच्या प्रश्नांची सखोल जाण आणि प्रशासनाशी प्रभावी संवाद साधण्याचा अनुभव ही त्यांची मोठी ताकद आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही भाजप त्यांच्या कर्तृत्वाचा व नियोजनाचा पुरेपूर उपयोग करून घेणार असल्याचे संकेत आहेत.

आज अंकुश बोढे यांचा वाढदिवस आहे.त्यांना अनेक स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत,त्यांच्या राजकीय व व्यवसायिक कारकीर्दीला अशीच भरभराट लाभो, त्यांच्यावर अधिकाधिक जबाबदाऱ्या येवोत आणि त्या जबाबदाऱ्या ते यशस्वीपणे पार पाडोत, हीच सदिच्छा.

नुकत्याच दोन जुळ्या कन्या त्यांच्या घरी लक्ष्मीरूपाने जन्मल्या आहेत आणि भाजपने वणी नगरपरिषद निवडणूकीत दणदणीत विजय प्राप्त करत एकहाती सत्ता मिळवली आहे त्यामुळे अंकुश बोढे यांचा हा वाढदिवस विशेष ठरला आहे….यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व दीर्घायुष्य लाभो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा…

शुभेच्छुक— वणीकर हब आणि सिटीहब मिडिया… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए