Homeमहाराष्ट्रवणी नगरपरिषद निवडणुकीनंतर सदिच्छा भेटीवरून राजकीय तर्कवितर्क; संजीव रेड्डी बोदकुरवार व अब्दुल...

वणी नगरपरिषद निवडणुकीनंतर सदिच्छा भेटीवरून राजकीय तर्कवितर्क; संजीव रेड्डी बोदकुरवार व अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी भूमिका स्पष्ट केली!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 सिटी हब मीडिया वणी…

वणी नगरपरिषद निवडणुकीनंतर घडलेल्या एका राजकीय घटनेमुळे शहराच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अपक्ष उमेदवार अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांची घेतलेली भेट आणि त्यासंदर्भात काही माध्यमांतून प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमुळे चर्चांना वेग आला होता.

काही वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला की अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील नगरपरिषदेला पाठिंबा दर्शविला आहे. यासंदर्भातील काही छायाचित्रेही सोशल मीडियावर व्हायरल झाली. या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातच काही प्रमाणात नाराजीचे सूर उमटल्याची माहिती समोर आली.

दरम्यान, या सर्व चर्चांवर माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले,

“अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी केवळ सदिच्छा भेट घेतली होती. त्यांनी माझ्या विजयाबद्दल अभिनंदन केले आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. मी त्यांना वणीच्या सर्वांगीण विकासासाठी काम करू, असे आश्वासन दिले आहे. त्यांनी मला पाठिंबा दिला किंवा मी त्यांचा पाठिंबा घेतला, असे म्हणणे चुकीचे आहे. वणीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, हीच माझी भूमिका आहे.”

यानंतर अपक्ष नगरसेवक अब्दुल हफिज उर्फ टापू यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,

“मी प्रभाग क्रमांक ९ मधून अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. नगरपरिषदेत भाजपची एकहाती सत्ता असल्याने माझ्या प्रभागाच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू नये, ही माझी भूमिका आहे. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी मला माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार तसेच भाजपचे सहकार्य आवश्यक आहे. म्हणूनच मी सदिच्छा भेट घेतली. भविष्यात नगरपालिकेत माझ्या सहकार्याची आवश्यकता भासल्यास, मी वणीच्या विकासासाठी त्यांच्या पाठीशी उभा राहीन.”

ते पुढे म्हणाले की, या भेटीकडे वेगळ्या राजकीय अर्थाने पाहू नये. “आमचे ध्येय एकच आहे—प्रभाग क्रमांक ९ चा विकास आणि वणीचा सर्वांगीण विकास. यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

उल्लेखनीय बाब म्हणजे, अब्दुल हफिज उर्फ टापू यांनी प्रस्थापितांना धक्का देत प्रभाग क्रमांक ९ मध्ये मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. भाजप समर्थित उमेदवारासह शिवसेना उमेदवारांचा पराभव करत त्यांनी आपली ताकद दाखवून दिली होती. त्यामुळेच त्यांनी अचानक घेतलेली संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यासोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

मात्र आता दोन्ही नेत्यांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्यानंतर, ही भेट कोणत्याही राजकीय सौदेबाजीसाठी नसून केवळ वणीच्या विकासासाठी घेतलेली सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात वणीच्या विकासासाठी आवश्यक तेव्हा सर्वजण एकत्रितपणे काम करणार असल्याचा निर्धार दोन्ही बाजूंनी व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए