Homeविदर्भनागपुर“माझ्या रक्ता-रक्तात हिंदुत्व” — संजीव रेड्डी बोदकुरवार,बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात वणीत तीव्र आक्रोश!

“माझ्या रक्ता-रक्तात हिंदुत्व” — संजीव रेड्डी बोदकुरवार,बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात वणीत तीव्र आक्रोश!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांकांवर होत असलेली हिंसा, हत्या आणि तेथील प्रशासनाची निष्क्रियता याच्या निषेधार्थ वणीत तीव्र आंदोलन करण्यात आले.

शनिवारी २७ डिसेंबर रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने बांगलादेशविरोधात आंदोलन करून आक्रोश व्यक्त करण्यात आला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

ते म्हणाले, “मी जरी राष्ट्रीय पक्षाचा माजी आमदार असलो, तरी माझ्या रक्ता-रक्तात हिंदुत्व भिनलेले आहे. जोपर्यंत हिंदू बांधव एकत्र येत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशसारखे अत्याचार थांबणार नाहीत. राजकारणाची चपला-जोडे बाहेर ठेवून एक हिंदू म्हणून एकत्र येण्याची हीच वेळ आहे.”

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असून देशात हिंदू सुरक्षित असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र पाकिस्तान आणि बांगलादेशात हिंदूंवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत असल्याने त्याविरोधात आवाज उठविणे ही आपली जबाबदारी असल्याचे सांगत त्यांनी बांगलादेश सरकारचा तीव्र निषेध केला.

यावेळी उपस्थितांनी “जय जय श्रीराम”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हिंदूंवरील अत्याचार थांबविण्यात आले नाहीत, तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, कल्याण पांडे, प्रशांत भालेराव, ॲड. प्रशांत पाठक, अनुराग काठेड, निलेश कटारिया, नितीन वासेकर, तुकाराम माथनकर, लक्ष्मण उरकुडे, अंकुश बोढे, लहुजी खामनकर, लोभेश्वर टोंगे, अजिंक्य शेंडे, संतोष लक्षेट्टीवार यांच्यासह विविध हिंदूनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए