Homeक्राइमपोलीस वर्धापन दिनानिमित्त वणी पोलीसांचा जनजागृतीचा पुढाकार!

पोलीस वर्धापन दिनानिमित्त वणी पोलीसांचा जनजागृतीचा पुढाकार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने वणी पोलीस स्टेशन, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने समाजप्रबोधन व कायदेविषयक जनजागृतीचा व्यापक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

या उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल ब्लॅक डायमंड स्कूल, आदर्श हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र तसेच आंबेडकर चौक येथील अभ्यासिका वणी येथील शाळा व कोचिंग क्लासेस येथे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या. तसेच आदर्श हायस्कूल, भगतसिंग चौक येथील विद्यार्थ्यांना वणी पोलीस स्टेशनमध्ये प्रत्यक्ष भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते.

यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनचे दैनंदिन कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, गुन्ह्यांच्या तपासाची कार्यपद्धती तसेच आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची भूमिका याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यासोबतच महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुड टच–बॅड टच, बालसुरक्षा, नवीन कायदे व कायद्यातील बदल यावर मार्गदर्शन करण्यात आले. आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112, 1091 व 1098 यांची माहिती देत त्यांचा योग्य वापर कसा करावा, हेही समजावून सांगण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. प्रश्नोत्तर सत्रातून विद्यार्थ्यांच्या विविध शंका दूर करण्यात आल्या. या उपक्रमामुळे कायद्याविषयीची भीती कमी होऊन पोलीस व नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

हा जनजागृती कार्यक्रम वणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पीएसआय सुदाम आसोरे, पीएसआय अंकुश वडतकर, पीएसआय शुभम महानवर तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल कावळे, पोलीस कॉन्स्टेबल शाम राठोड व इमरान खान आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए