Follow Us On

Thursday, March 19, 2026
spot_img

भाषा चुनें

[gtranslate]

More
    Homeमहाराष्ट्रडॉ. विनोदकुमार आदे समाज गौरव पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित!

    डॉ. विनोदकुमार आदे समाज गौरव पुरस्काराने नागपूर येथे सन्मानित!

    -

    [gtranslate]

    Advertisementspot_img

    सिटी हब मिडिया वणी…

    श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या वतीने भारतातील पहिल्या शिक्षिका, स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या व सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. ४ जानेवारी २०२६ ला दिघोरी नाक्याच्या मागे, पडोळे लॉनजवळ, नागपूर येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

    या महोत्सवात 2026 चा समाज गौरव पुरस्कार यवतमाळ जिल्ह्यातील कलावंत, साहित्यिक तथा संपादक डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला. 

     

    2008 पासून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तालुका ते राज्यस्तरीय प्रज्वलन या नावाने मारेगाव व वणीतही दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम राबवून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना डॉ. विनोदकुमार आदे यांनी मानवंदना दिली. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र्यदिनानिमित्त मारेगाव व वणी येथे विविध चालू घटकांवर डॉ. विनोदकुमार आदे यांनी. प्रबोधनात्मक पोस्टर रांगोळ्या काढून जनतेचे लक्ष वेधून जनजागृती केली आहे.

     

    मतदान, हुंडाबळी, व्यसन, बेरोजगारी, देशभक्ती, कोरोना यावर आधारित गीते तयार करून, गाऊन, लघुचित्रपटाची ही निर्मिती केली, त्यांचा टुकार नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित असून, “अजून माझा बाप काही केल्या मरत नाही” नावाचा कथासंग्रह व “बाप” नावाचा कवितासंग्रह आणि “तडतडात” नावाचा कवितासंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे, डॉ. विनोदकुमार आदे हे सध्या वणी न्यूज एक्सप्रेस या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक असून त्यांनी शेकडो कला आत्मसात केल्या आहेत. एक उत्कृष्ट असे ग्राफिक्स डिझायनरही‌ आहे.

     

    चित्रकला, मूर्तिकला, हस्तकला, शिल्पकला, रांगोळी कला, गायन, लेखक, कवी, संगीतकार, गीतकार, वैज्ञानिक इत्यादी गुण त्यांच्या अंगी आहे.

    कला व संशोधन या क्षेत्रासाठी हेसन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीने त्यांना पीएचडी बहाल केली आहे. त्यांच्या या भरीव व समाज कार्यासाठी यंदाचा समाज गौरव पुरस्कार डॉ. विनोदकुमार आदे यांना प्रदान करण्यात आला.

     

     श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी दशकाचे औचित्य साधून संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा इतिहास मांडणारी ‘फुललेली बाग’ ही स्मरणिका प्रकाशित करण्यात आली. या स्मरणिकेमध्ये डॉ. विनोदकुमार आदे

    यांनी लिहिलेला “माझे माहेर नवरगाव” हा लेख समाविष्ट करण्यात आला. या लेखात गावच्या आठवणी विस्तृतपणे त्यांनी मांडल्या.

    त्यांच्या या लेखाची समाज बांधवांनी प्रशंशा केली.

     

     यावेळी मंचावर चंद्रपूर येथील प्रसिद्धतज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सौ. अभिलाषाताई गावतूरे, एस.व्ही.ई.टी., नागपूरचे प्राचार्य डॉ. श्री. विजय वाढई सर, गोंडपिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते बबनराव निकुळे, महात्मा फुले शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका व संत साहित्याच्या अभ्यासिका प्रा. डॉ. अलकाताई बी. झाडे, चंद्रपूरचे एम.डी. पॅथॉलॉजिस्ट व सामाजिक कार्यकर्ते डॉ. राकेश गावतूरे, नागपूरच्या माजी नगरसेविका सुनंदाताई नाल्हे, तसेच माळी वैभवचे कार्यकारी संपादक मनोहर चलपे, श्री क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ), नागपूर संस्थेचे अध्यक्ष कृष्णा महादुरे यांची उपस्थिती होती.

    या कार्यक्रमाला समाजबांधवांनी सहकुटुंब मोठ्या संख्येने हजेरी लावली.

    Advertisementspot_img

    youtube व्हिडिओस

    Video thumbnail
    महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
    05:56
    Video thumbnail
    DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
    03:44
    Video thumbnail
    ‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
    05:27
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    00:51
    Video thumbnail
    जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
    00:56
    Video thumbnail
    सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
    06:03
    Video thumbnail
    वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
    03:30
    Video thumbnail
    जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
    07:10
    Video thumbnail
    भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
    04:51
    Video thumbnail
    श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
    01:54:59
    Video thumbnail
    City Hub Media is live
    07:16
    Video thumbnail
    "वणी की विरासत और हंसी का संगम"।
    51:03
    Video thumbnail
    “हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
    32:08
    Video thumbnail
    City Hub Media is live
    31:18
    Video thumbnail
    श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
    32:11
    Video thumbnail
    City Hub Media is live
    01:26
    Video thumbnail
    डिजिटल क्लासरूम साठी एक कोटी खर्च पण विद्यार्थ्यांना शिक्षकांची प्रतिक्षा, ग्रामीण भागातील वास्तव.
    05:05
    Video thumbnail
    शिवचरित्राचा प्रत्येक प्रसंग प्रेरणादायी,चार वेदांनतर पाचवा वेद म्हणजे शिवचरित्र...
    19:19
    Video thumbnail
    शिवचरित्र पाचवा वेद आहे, शिवचरित्र आत्मसात करणं आजच्या काळात खूप आवश्यक आहे-- राजेंद्र ताजणे शिवांश.
    19:19
    Video thumbnail
    माझ्या फायर ने माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्राला करून दिली.त्याच्यामुळेच मान, सन्मान सगळीकडे मिळतो...
    10:03
    Advertisementspot_img

    Stay Connected

    0FansLike
    25,000FollowersFollow
    0FollowersFollow
    13,000SubscribersSubscribe
    Advertisementspot_img

    यह भी पढ़िए