Homeमहाराष्ट्रजिजाऊ माता जयंतीनिमित्त वणीमध्ये भव्य शपथग्रहण सोहळा,12 जानेवारीला भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन!

जिजाऊ माता जयंतीनिमित्त वणीमध्ये भव्य शपथग्रहण सोहळा,12 जानेवारीला भाजपचे राजकीय शक्तिप्रदर्शन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने एकहाती सत्ता आपल्या ताब्यात घेत राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे. नगराध्यक्षपदासह तब्बल 18 नगरसेवक भाजपकडून निवडून आल्याने शहराच्या राजकारणात भाजपचा दबदबा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या निवडणुकीत भाजपने इतर सर्व पक्षांना जोरदार धक्का देत वणीमध्ये आपले वर्चस्व कायम राखले आहे.

या ऐतिहासिक विजयानंतर 12 जानेवारी रोजी जिजाऊ माता जयंतीचे औचित्य साधून भव्य शपथग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा नगरपालिका आवारात मोठ्या प्रमाणावर पार पडणार असून यामध्ये भाजपच्या नगराध्यक्ष विद्याताई आत्राम या औपचारिकरीत्या नगराध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. याचवेळी निवडून आलेले 18 नगरसेवक पदभार स्वीकारणार असून, उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत सदस्यांची निवड देखील याच कार्यक्रमात होणार आहे.

भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने उपनगराध्यक्षपद देखील भाजपकडेच जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्यामुळे वणी नगरपरिषदेत भाजपचे संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित होणार आहे.

या भव्य सोहळ्याच्या तयारीसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली असून, पदाधिकारी व कार्यकर्ते युद्धपातळीवर कामाला लागले आहेत. कार्यक्रम अधिक भव्य-दिव्य करण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या शपथग्रहण सोहळ्यात भाजपकडून काही मोठे राजकीय सरप्राईज मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत भाजपचे वरिष्ठ नेते सध्या मौन बाळगत आहेत.

या निवडणुकीत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार व शहराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने यश संपादन करत आपले अस्तित्व अधिक मजबूत केले आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनात्मक ताकद वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

12 जानेवारीच्या शपथग्रहण सोहळ्यात कोणते वरिष्ठ नेते उपस्थित राहणार, कार्यक्रमाचे नेमके स्वरूप काय असेल आणि कोणते निर्णय जाहीर होतील, याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भाजप सरप्राईज देण्यात पटाईत असल्याने, या दिवशी वणीकर जनतेला काही मोठे राजकीय संदेश मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सोहळ्यानंतर वणी नगरपालिकेत भाजपचे अधिकृत राज्य सुरू होणार असून, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम यांच्या हाती शहराची धुरा जाणार आहे. येत्या काळात वणीच्या विकासासाठी भाजपकडून आक्रमक व निर्णायक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए