Homeखेलनृसिंह व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन!

नृसिंह व्यायाम शाळेच्या मैदानावर भव्य कबड्डी महोत्सवाचे आयोजन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी येथील नृसिंह व्यायाम शाळेच्या प्रांगणात क्रीडाप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणारी भव्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून ही स्पर्धा १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. नृसिंह व्यायाम शाळेद्वारे संचालित नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणी यांच्या पुढाकारातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी विजय चोरडिया (जिल्हा संघटक, शिवसेना – शिंदे गट) हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय खाडे (संचालक, कापूस उत्पादन पणन महासंघ, महाराष्ट्र) हे असतील.

या वेळी प्रमुख अतिथी म्हणून कुणाल चोरडिया (युवा सेना – शिंदे), प्रमोद इंगोले (अध्यक्ष, नृसिंह व्यायाम शाळा वणी), प्रमोद निकोरे (अध्यक्ष, शिवाजी व्यायाम शाळा वणी), अंकुश बोढे (जिल्हा उपाध्यक्ष, भाजप), सैफुर रहमान (नगरसेवक), अनिल आक्केवार (सचिव, केशव नागरी पतसंस्था वणी), प्रविण झाडे (तालुकाध्यक्ष, सरपंच संघटना वणी), विजय गाडगे (संचालक, संजय ऑटोमोबाईल्स वणी), शंकर झिलपे (संचालक, हायवे किंग फॅमिली रेस्टॉरंट, वाघदरा), गुलाम रसूल रंगरेज (नगरसेवक वणी), जितेंद्र डाबरे (संचालक, नृसिंह मेडिकल वणी), संजय पावडे (संचालक, लक्ष्मी कृषी केंद्र वणी), सागर पोटे (संचालक, हॉटेल मैफिल वणी) व फारुख चिनी (संचालक, सेव्हन स्टार बेकरी वणी) यांची उपस्थिती राहणार आहे.

ही कबड्डी स्पर्धा ५६ किलो वजन गटात खेळविण्यात येणार असून विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.

प्रथम क्रमांक: ₹20,001 व चषक

द्वितीय क्रमांक: ₹15,001 व चषक

तृतीय क्रमांक: ₹10,001 व चषक

चतुर्थ क्रमांक: ₹7,001 व चषक

यासोबतच उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू यांना प्रत्येकी ₹2,100 व चषक देण्यात येणार आहे. तसेच श्री गजानन स्पोर्ट्स तर्फे बाद फेरीतील उत्कृष्ट खेळाडूस विशेष चषक प्रदान करण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महिला कबड्डी संघांचा सहभाग. उद्घाटन समारंभात महिलांचे लक्षवेधी सामने होणार असून त्यामध्ये नृसिंह स्पोर्टिंग क्लब वणीच्या राष्ट्रस्तरीय (सब-ज्युनिअर) खेळाडू गौरी पिदुरकर तसेच राज्यस्तरीय खेळाडू श्रद्धा देशमुख व जान्हवी ठाकरे यांचा समावेश असणार आहे. महिला संघासाठी आम्रपाली रेस्टॉरंटकडून चषक व पदके देण्यात येणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष कुणाल ठोंबरे, कार्याध्यक्ष गोविंदा मुजगेवार, उपाध्यक्ष अनिकेत वाढई, सचिव ब्रिजेश निंदेकर, कोषाध्यक्ष रोहित ठोंबरे तसेच सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी

📞 कुणाल ठोंबरे – ९९२१८४२११७

📞 ब्रिजेश निंदेकर – ९०२८४९७९१९

या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए