Homeमहाराष्ट्रभाजपच्या निष्ठावान योद्ध्याला मानाचा सन्मान; रवि बेलूरकर वणी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य!

भाजपच्या निष्ठावान योद्ध्याला मानाचा सन्मान; रवि बेलूरकर वणी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

भाजपच्या निष्ठावान योद्ध्याचा सन्मान; रवि बेलूरकर यांची वणी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती…

 

हिंदुत्वाच्या विचारधारेशी गेल्या जवळपास तीन दशकांपासून निष्ठेने जोडलेले, संघटनात्मक ताकद आणि राजकीय अनुभवाचा भक्कम पाया असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते रवि बेलूरकर यांची भारतीय जनता पक्षाने वणी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे भाजप कार्यकर्ते, समर्थक व संघटनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रवि बेलूरकर हे प्रखर हिंदुत्ववादी कार्यकर्ते असून राम नवमी शोभायात्रा समितीचे अध्यक्ष, तसेच श्री दुर्गा माता नवशक्ती मंदिर, आंबेडकर चौक येथील अध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक व सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. विद्यार्थी दशेपासूनच ते हिंदुत्ववादी चळवळीशी जोडले गेले असून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात अभाविपमध्ये पूर्णकालिक कार्यकर्ता म्हणून केली.

विशेष बाब म्हणजे, सन 2002 मध्ये अत्यंत तरुण वयातच भाजपने त्यांच्यावर माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली वणी शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी सलग तीन टर्म शहराध्यक्ष म्हणून पक्षसंघटन मजबूत केले. ज्या काळात वणी विधानसभा व वणी शहरात भाजपची उपस्थिती नगण्य होती, त्या काळापासून ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्या काळात स्वतः आपल्या हाताने जागोजागी भाजपची पोस्टर्स लावणे, प्रचार करणे, कार्यकर्ते उभे करणे असे कष्टाचे काम त्यांनी केले आहे.

रवि बेलूरकर यांनी अनेक युवक, युवतींना भाजपच्या विचारधारेशी जोडले, त्यांना संघटनेत मानाचे स्थान मिळवून दिले आणि नवे नेतृत्व घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जिल्हा उपाध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी यवतमाळ जिल्हा भाजपचे सरचिटणीस (महामंत्री) म्हणून कार्य केले असून, त्या कार्यकाळातही त्यांनी संघटनात्मक जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे पार पाडली.

सध्या ते यवतमाळ जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष असून वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या रणनीती, मार्गदर्शन व संघटन कौशल्यामुळेच भाजपचे १८ नगरसेवक व नगराध्यक्ष निवडून येत वणी नगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित झाली, असे भाजप गोटातून सांगितले जात आहे.

रवि बेलूरकर हे भाजपच्या कोर कमिटीचे सक्रिय सदस्य असून वरिष्ठ नेतृत्वाच्या विश्वासातील कार्यकर्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. पक्षाच्या वरिष्ठ टीममध्ये त्यांचा समावेश असून भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांचा सन्मान आहे. कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून जाणारे, जनतेच्या सेवेसाठी नेहमी तत्पर असणारे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करणारे नेता अशी त्यांची वेगळी ओळख राज्य, जिल्हा व स्थानिक पातळीवर निर्माण झाली आहे.

माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या विजयामध्येही रवि बेलूरकर यांचा मोठा वाटा राहिला असून, त्यांनी खांद्याला खांदा लावून वणी विधानसभेत संघटनात्मक पातळीवर प्रभावी काम केले आहे. यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीतही रवी बेलूरकर हे भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून सर्वश्रुत व सर्वपरिचित नाव आहे.

वणी नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून झालेली ही नियुक्ती म्हणजे भाजपने त्यांच्या दीर्घकालीन निष्ठा, कष्ट, संघटन क्षमता आणि पक्षनिष्ठेचा केलेला योग्य सन्मान व पोचपावती असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे. या नियुक्तीमुळे भाजपमध्ये पुन्हा एकदा आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए