Homeमहाराष्ट्रवणी शहरासह ग्रामीण भागातही भाजपचा झेंडा कायम राहणार – हेमंत गौरकार

वणी शहरासह ग्रामीण भागातही भाजपचा झेंडा कायम राहणार – हेमंत गौरकार

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपालिकेतील भाजपचा विजय म्हणजे विकासाभिमुख राजकारणाचा विजय – हेमंत गौरकार…

वणी नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचा दणदणीत विजय हा विकासाभिमुख राजकारणाचा स्पष्ट विजय असल्याचे प्रतिपादन खांदला गावाचे सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हेमंत गौरकार यांनी केले आहे. सिटी हब मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितले की, राजकारण हे लोकांसाठी, लोकांच्या सेवेसाठी असते आणि भाजपने नेहमीच ही भूमिका जपली आहे.

भाजपने निवडणुकीत विकासाचे मुद्दे केंद्रस्थानी ठेवून जनतेसमोर भूमिका मांडली. शहरी भागातील विकासासोबतच ग्रामीण भागाच्या प्रगतीवरही भर देण्यात आला. त्यामुळेच वणीकर जनतेने भाजपवर विश्वास दाखवत एकहाती सत्ता बहाल केली, असे गौरकार म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, भाजपची ही विजययात्रा येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकांमध्येही कायम राहणार आहे. भाजपने शहरी मतदारांसह ग्रामीण भागातही आपली मजबूत पकड निर्माण केली आहे. शहरी व ग्रामीण जनतेचे जीवनमान कसे उंचावता येईल, विकासाचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल, यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असते.

भाजपचे नेते व कार्यकर्ते लोकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्या मार्गी लावण्यासाठी कायम सक्रिय असतात. कोणतीही अडचण असो, सर्वात आधी भाजपचे कार्यकर्ते मदतीसाठी पुढे येतात. त्यामुळेच माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर आणि भाजप तालुका प्रमुख प्रदीप जेऊरकर यांच्या नेतृत्वात विकासाभिमुख राजकारणाचा लाभ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजपच्या उमेदवारांना निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शहरी असो वा ग्रामीण भाग, भाजपचे उमेदवार नेहमीच जनतेच्या संपर्कात असतात. सातत्यपूर्ण भेटीगाठी व मजबूत जनसंपर्कामुळे भाजपला पोषक वातावरण तयार झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही भाजप नेहमीच अग्रेसर राहिली असून, नुकत्याच जाहीर झालेल्या पॅकेजमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही भाजपचा झेंडा फडकत राहील, असे गौरकार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे हेमंत गौरकार यांनी अभिनंदन केले. माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शहराध्यक्ष ॲड. निलेश चौधरी यांच्या नेतृत्वात भाजप वणीकर जनतेसाठी हितकारक निर्णय घेईल. हे निर्णय ग्रामीण भागातही सकारात्मक परिणाम घडवतील आणि वणीची विकासगंगा अविरत सुरू राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 हेमंत गौरकार सरपंच, खांदला गाव, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वणी… 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Video thumbnail
जनप्रतिनिधीच्या राजकीय दबावामुळे निलजई ग्रामस्थांवर अन्याय खपवून घेणार नाही, गावकरी आक्रमक भुमिकेत.
14:11
Video thumbnail
आर्थिक अमिषाला बळी पडून आपले बॅंक अकाउंट दुसऱ्या कुणालाही वापरू देऊ नये…
02:29
Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए