Homeमहाराष्ट्रप्रभाग क्रमांक ८ मधील नागरी समस्यांवर भाजप नगरसेविका प्रमीला चौधरी यांचा ठोस...

प्रभाग क्रमांक ८ मधील नागरी समस्यांवर भाजप नगरसेविका प्रमीला चौधरी यांचा ठोस पाठपुरावा ; नगराध्यक्षांकडे सविस्तर निवेदन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

 सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ. प्रमीला मनोज चौधरी यांनी नगराध्यक्ष सौ. विद्या ताई खेमराज आत्राम यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. प्रभागातील स्वच्छता, रस्ते, नाले व नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी स्पष्ट मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना गेल्या काही काळापासून मूलभूत सुविधांच्या अभावामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः स्वच्छतेचा प्रश्न हा सर्वाधिक गंभीर असून अनेक ठिकाणी नाल्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे.

नगरसेविका सौ. प्रमीला चौधरी यांनी पुढील प्रमुख मुद्द्यांकडे नगरपरिषदेचे लक्ष वेधले आहे :

प्रमुख मागण्या :

१) नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते :

प्रभागातील अनेक भागांमध्ये अंतर्गत रस्ते पूर्णतः खराब झाले असून नागरिकांना चालणे तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

गुरुनगर, खाती चौक, विराणी हॉल परिसर, बेलदारपुरा, शिवाजी आखाडा आदी भागांत नवीन सिमेंट काँक्रिट रस्ते तातडीने बांधण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

२) नाल्यांचे झाकण-चेंबर नवीन बसवणे :

प्रभागातील विविध ठिकाणी नाल्यांचे झाकण तुटलेले अथवा गायब असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

खाती चौक, विराणी हॉल रोड, जनता शाळा परिसर, काळे हॉस्पिटल परिसर आदी ठिकाणी नवीन झाकण-चेंबर बसवण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

३) अपघातप्रवण ठिकाणी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) काही रस्त्यांवर वाहनांचा वेग अधिक असल्याने वारंवार अपघात होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काळे हॉस्पिटल ते ठाकरे हॉस्पिटल मार्गासह इतर ठिकाणी गतिरोधक बसवण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

४) सार्वजनिक स्वच्छता व कचरा व्यवस्थापन :

इंदिरा चौक, खाती चौक व इतर भागांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर अस्वच्छ झाला आहे. संबंधित ठिकाणी कचरा नियमित उचलून परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ललिता चव्हाण यांच्या घराजवळील कचऱ्याचा प्रश्नही तातडीने मार्गी लावावा, असे नमूद करण्यात आले आहे.

५) अंडरग्राऊंड नाल्यांची साफसफाई :

खाती चौक, गुरुनगर, विराणी टाकीज परिसर, इंदिरा चौक, बेलदार पुरा आदी ठिकाणी अंडरग्राऊंड नाल्यांची नियमित साफसफाई करून दुर्गंधी व साचलेल्या पाण्याची समस्या सोडवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

६) सार्वजनिक संडास व पिण्याच्या पाण्याची सुविधा :

खाती चौक येथे नगरपरिषद संडास बंद असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. सदर संडास बंद करून त्या जागेवर बाग विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच इंदिरा चौक येथे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता नगरपरिषदेतर्फे ‘वॉटर एटीएम’ बसवण्यात यावा, अशी सूचनाही करण्यात आली आहे.

या सर्व मागण्या तातडीने पूर्ण करून प्रभाग क्रमांक ८ मधील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा नगरसेविका सौ. प्रमीला चौधरी यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने पाठपुरावा करणार असून नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए