सिटी हब मिडिया वणी…
प्रभाग ९ मधील नागरिकांतर्फे लोकप्रतिनिधींचा गौरव…

प्रभाग क्रमांक ९ मधील साई नगरी परिसरात ५ फेब्रुवारी २०२६ रोजी रहिवाशांच्या वतीने नगर परिषदेच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगर परिषदेच्या अध्यक्षा मा. सौ. विधाताई आत्राम तसेच प्रभाग ९ चे नगरसेवक श्री. अब्दुल हफीज, श्री. शत्रुघ्न मालेकर व सौ. किरणताई देरकर यांचा स्थानिक नागरिकांतर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश मांडवकर सर यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती म्हणून नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. विधाताई आत्राम, नगरसेवक अब्दुल हफीज, सौ. किरणताई देरकर, श्री. शत्रुघ्न मालेकर तसेच शंकर देरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन आरिफ कच्ची सर यांनी केले. कार्यक्रमाची भूमिका डॉ. सय्यद अतिक यांनी मांडली, तर उपस्थितांचे आभार नईम शेख यांनी व्यक्त केले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील भाऊ जिवणे, रवी मैंद, महमूद भाई, अजय गवळी, राजेश पामपट्टीवार, कौसर भाई, सचिन जुनघरी, सुगन कोचर, शोभना मॅडम, डॉ. सौ. शहा, निमाताई जिवणे, सौ. धंद्रे ताई, सौ. मांडवकर ताई, सौ. जुनघरी, सौ. व श्री. मोहम्मद सदीद सर, सौ. फरहीन आदींनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

























