Homeमहाराष्ट्रभाजप नेत्यांच्या खंबीर नेतृत्वापुढे प्रशासन झुकले; खांदला परिसरातील प्रदूषणाविरोधात लढ्याला यश, गावकऱ्यांसाठी...

भाजप नेत्यांच्या खंबीर नेतृत्वापुढे प्रशासन झुकले; खांदला परिसरातील प्रदूषणाविरोधात लढ्याला यश, गावकऱ्यांसाठी वेकोलीकडून आरोग्य शिबिराचे आयोजन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

नेतृत्वात जर ठामपणा, धैर्य आणि जनतेसाठी लढण्याची तयारी असेल, तर प्रशासनालाही अखेर झुकावे लागते—याचा प्रत्यय खांदला गावात पुन्हा एकदा आला आहे. मागील काही वर्षांपासून खांदला व परिसरातील गावांमध्ये वेकोलीच्या कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले होते. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून कॅन्सरसह विविध आजारांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले होते.

वेकोलीच्या अवजड वाहतुकीमुळे गावातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली होती. धूळ, धूर आणि प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त झाले होते. केवळ माणसांनाच नव्हे तर जनावरांनाही याचा मोठा फटका बसत होता. जनावरांच्या आरोग्यात बिघाड, चाऱ्याचा रंग बदलणे, शेतीवर होणारे परिणाम यामुळे गावकरी हतबल झाले होते. खांदल्यासह आसपासची किमान सहा गावे या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली होती.

या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर आणि खांदला गावाचे सरपंच हेमंत गौरकार यांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, दखल घेतली जात नसल्याने अखेर गावकऱ्यांच्या सहकार्याने खांदला रोडवर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान वेकोलीची संपूर्ण कोळसा वाहतूक ठप्प करण्यात आली आणि एकही कोळसा वाहून जाऊ दिला गेला नाही.

या ठोस आणि आक्रमक आंदोलनामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गावकऱ्यांना वेकोलीच्या वाहतुकीमुळे झालेल्या त्रासाबाबत दिलगिरी व्यक्त केली. यापुढे नागरिकांच्या आरोग्याला आणि शेतीला कोणतेही नुकसान होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. तसेच गावकऱ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील, अशी ग्वाहीही देण्यात आली.

या आश्वासनांचा प्रत्यय आज  दिनांक १०फेब्रुवारीला प्रत्यक्षात आला. खांदला गावात तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात वेकोलीच्या अधिकाऱ्यांसह घुग्गुस येथील राजीव रतन हॉस्पिटलमच्या डॉक्टऱ्यांचा चमूने गावकऱ्यांची सखोल आरोग्य तपासणी केली, आजारांबाबत माहिती घेतली आणि आवश्यक वैद्यकीय सल्ला दिला. भविष्यातही अशा प्रकारची शिबिरे नियमितपणे घेतली जातील, असे स्पष्ट करण्यात आले.

तसेच एखाद्या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यास त्यांच्यावर घुगुस येथील राजीव रतन रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येतील, अशी ठाम भूमिका वेकोली प्रशासनाने जाहीर केली आहे. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून वेकोलीने आपली भूमिका स्पष्ट करत गावकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा मानस दाखवला आहे.

एकूणच, विजय पिदुरकर यांच्या खंबीर नेतृत्वामुळे आणि हेमंत गौरकार यांच्या सक्रिय भूमिकेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आणि प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागली. लोकांच्या प्रश्नांसाठी लढणारे नेतृत्व असेल, तर कुठल्याही परिस्थितीत प्रशासनाला झुकावेच लागते हे खांदला प्रकरणातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए