सिटी हब मिडिया वणी…
वणी–घुगुस मार्गावरील भीषण अपघातात मृत्यू झालेल्या रवि मंगेश कोहळे यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र या घटनेतून त्यांच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची परिस्थितीही समोर आली आहे.

रवि मंगेश कोहळे हे रोजंदारीवर मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मिळेल ते काम करून ते घर चालवत होते. त्यांची पत्नीही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत आहेत. अपघातात अचानक झालेल्या निधनामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून अंत्यसंस्कारासाठीही पैसे नसल्याची शोकांतिका उघड झाली…
ही बाब वणीतील सामाजिक कार्यकर्ते उमेश पोद्दार यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ पुढाकार घेत मदतीचा हात पुढे केला. रवि कोहळे यांच्या मित्राने त्यांच्याकडे धाव घेतली असता, उमेश पोद्दार यांनी कोणतीही विलंब न लावता अंत्यसंस्कारासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली आणि त्यानंतर रवि कोहळे यांच्यावर वणीतील मोक्षधाम इथे अंत्यसंस्कार पार पडले…
उमेश पोद्दार यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर हा संकल्प घेतला होता की अंत्यसंस्कारासाठी ते गरीब व गरजूंना मदत करत राहतील.
ही घटना एकीकडे दुर्दैवी असली तरी दुसरीकडे समाजातील माणुसकी अजूनही जिवंत असल्याचे उदाहरण ठरली आहे..

























