Homeमहाराष्ट्रवणीतून छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादसाठी थेट बससेवा सुरू करा; मानवी हक्क सुरक्षा...

वणीतून छत्रपती संभाजीनगर आणि हैदराबादसाठी थेट बससेवा सुरू करा; मानवी हक्क सुरक्षा परिषदेची मागणी!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी शहराच्या औद्योगिक विस्तारामुळे आणि वाढत्या गरजांमुळे येथील नागरिकांचा शैक्षणिक, वैद्यकीय आणि व्यावसायिक कारणांसाठी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) व हैदराबाद या शहरांशी मोठा संपर्क येतो. मात्र, या दोन्ही प्रमुख शहरांसाठी वणी आगारातून थेट बससेवा उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. ही गैरसोय दूर करण्यासाठी मानवी हक्क सुरक्षा परिषदेने पुढाकार घेत वणी आगार प्रमुखांना विशेष निवेदन सादर केले आहे.

प्रवाशांची कसरत थांबवण्याची मागणी

वणी परिसरातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगरला जातात, तर उपचारांसाठी आणि व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर लोक हैदराबादला पसंती देतात. सध्या थेट बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो किंवा वाटेत बस बदलून प्रवास करावा लागतो. यामुळे वेळ आणि पैसा दोन्हीचा अपव्यय होत आहे. जनतेची हीच अडचण लक्षात घेऊन मानवी हक्क सुरक्षा परिषदेने आगार व्यवस्थापक विवेक बन्सोड यांची भेट घेतली.

शिष्टमंडळाची आगार प्रमुखांशी चर्चा

१७ फेब्रुवारी रोजी परिषदेच्या वतीने देण्यात आलेल्या या निवेदनात, वणी-छत्रपती संभाजीनगर आणि वणी-हैद्राबाद या फेऱ्या तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदन सादर करताना उपस्थित मान्यवर:

राजु धावंजेवार (राज्याध्यक्ष, मानवी हक्क सुरक्षा परिषद)

परशुराम पोटे (महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख)

सौ. सुमित्रा नारायण गोडे (महिला जिल्हा संपर्कप्रमुख)

भाऊसाहेब आसुटकर (विधानसभा अध्यक्ष)

सौ. प्रमिला चौधरी (शहर महिला अध्यक्ष)

सौ. मनिष निब्रड (जिल्हा महिला उपाध्यक्ष)

अजय चन्ने (वणी शहर अध्यक्ष)

तसेच संजय चिंचोलकर, ज्ञानेश्वर बोनगीनवार, सुरेश बन्सोड व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

प्रवाशांच्या हिताचा विचार करून एसटी प्रशासनाने या दोन्ही मार्गांवर लवकरच लालपरी धावावी, अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए