सिटी हब मिडिया वणी…
वणी शहरात आज बुधवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास खूनाची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाकडे पेट्रोल पंपाजवळील संजय ऑटोमोबाईल्सच्या गेटसमोर एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली.

प्राथमिक माहितीनुसार, मृतक हा वणीतील दामले फैलातील रहिवासी असून त्याचे नाव मल्लेश असल्याची माहिती समोर आली आहे. आपसी वादातून हा खून झाल्याची प्राथमिक चर्चा सुरू असून पोलिसांकडून या अनुषंगाने तपास करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात मोठी गर्दी जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व पुढील उत्तरीय तपासणी (पोस्टमार्टम) करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.
या प्रकरणी संबंधित आरोपींचा शोध घेण्याचे तसेच घटनेमागील नेमके कारण उघड करण्याचे काम पोलीस करीत आहेत. सध्या तपास सुरू असून अधिकृत माहिती समोर आल्यानंतर बातमी अद्ययावत करण्यात येईल.

























