Homeमहाराष्ट्रशिवतीर्थावर घुमणार 'युवा हुंकार'; वणी विधानसभेत अन्यायाविरुद्ध तरुणांची वज्रमुठ!

शिवतीर्थावर घुमणार ‘युवा हुंकार’; वणी विधानसभेत अन्यायाविरुद्ध तरुणांची वज्रमुठ!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या पवित्र शिवतीर्थ रायगड किल्ल्याच्या साक्षीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची मशाल हाती घेऊन ‘युवा हुंकार’ या नव्या सामाजिक संघटनेचा शंखनाद करण्यात आला आहे. शिवजयंतीचे औचित्य साधत, वणी विधानसभा क्षेत्रातील तरुणांना संघटित करून समाजकार्यासाठी सज्ज करण्याचा निर्धार संस्थापक अध्यक्ष अजिंक्य शेंडे यांनी यावेळी व्यक्त केला.

स्वराज्याच्या प्रेरणेतून समाजकार्याचा संकल्प

केवळ संघटना न उभारता, तरुणाईचा एक बुलंद आवाज निर्माण करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. ही संघटना प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे:

प्रशासकीय कामांना गती: वणी विधानसभा क्षेत्रातील सामान्य नागरिकांची सरकारी दरबारी रखडलेली कामे मार्गी लावणे.

अन्यायाविरुद्ध संघर्ष: जिथे सामान्य जनतेवर अन्याय होईल, तिथे ही संघटना थेट रणांगणात उतरून लढा देणार आहे.

सामाजिक आणि शैक्षणिक चळवळ: समाजहितासाठी सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून तळागाळातील शेवटच्या माणसाला आधार देणे.

“शिवविचारांचा वारसा जपणे आणि समाजाचे हित जोपासणे हाच आमचा ध्यास आहे. वणी तालुक्यातील सामान्यांच्या हक्कासाठी ‘युवा हुंकार’ सदैव तत्पर राहील,” अशी ग्वाही अजिंक्य शेंडे यांनी यावेळी दिली.

अराजकीय पाऊल: युवकांची मोठी उपस्थिती

  • विशेष म्हणजे, ही संघटना पूर्णपणे अराजकीय असून केवळ लोकहित आणि सामाजिक कार्यासाठी समर्पित राहणार आहे. रायगड येथे झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्याला अजिंक्य शेंडे यांच्यासह राजू तुरणकर, बंडू चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य बिलोरीया, श्रीकांत उके, रौनक बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुतकर आणि अनेक शिवभक्त उपस्थित होते.
Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए