Homeमहाराष्ट्रश्रमाचा सन्मान! वणीत कष्टकरी महिलांना फळवाटप करून 'महिला दिन' साजरा,, सौ. संगीता...

श्रमाचा सन्मान! वणीत कष्टकरी महिलांना फळवाटप करून ‘महिला दिन’ साजरा,, सौ. संगीता खाडे व धनोजे कुणबी महिला विकास संस्थेचा स्तुत्य उपक्रम!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून केवळ भाषणाबाजी न करता, प्रत्यक्ष उन्हातान्हात राबणाऱ्या हातांना मदतीचा आधार देत वणीत संवेदनशील उपक्रम राबवण्यात आला. धनोजे कुणबी महिला विकास संस्था आणि शारदा उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ. संगीता संजय खाडे यांच्या पुढाकाराने शहरातील कष्टकरी महिला, गरजू रुग्ण आणि महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करत फळवाटप करण्यात आले.

शिवरायांना अभिवादन करून मोहिमेला सुरुवात… कार्यक्रमाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि अभिवादन करून करण्यात आला. स्त्री शक्तीचा जागर करतानाच, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

उन्हातील सावली: कष्टकरी भगिनींशी संवाद…

रणरणत्या उन्हाची पर्वा न करता भाजीपाला विक्री करणाऱ्या, रस्त्याच्या कडेला बसून छोटे व्यवसाय करणाऱ्या आणि प्रपंचाचा गाडा ओढणाऱ्या श्रमजीवी महिलांशी सौ. संगीता खाडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी थेट संवाद साधला. या भगिनींना फळे आणि थंड पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करून त्यांच्या कष्टाची दखल घेण्यात आली.

रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात सन्मान…

आरोग्य सेवा: ग्रामीण रुग्णालय आणि नगराळे हॉस्पिटलमधील प्रसूती झालेल्या मातांना पौष्टिक फळे आणि पाणी देण्यात आले.

खाकीचा गौरव: पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्य बजावणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा शाल आणि पाणी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

“स्वतःच्या कष्टावर संसार उभा करणाऱ्या महिला हे समाजाचे खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे मत सौ. संगीता संजय खाडे यांनी यावेळी व्यक्त केले.

यांची लाभली उपस्थिती…

या उपक्रमात धनोजे कुणबी महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. साधनाताई गोहोकार, समिती सल्लागार किरणताई देरकर यांच्यासह वंदनाताई आवारी, अर्चनाताई बोधाडकर, कविताताई चटकी, साधनाताई मत्ते, स्मिताताई नांदेकर, प्रमिलाताई पावडे, हर्षाताई सपाट, वंदनाताई बल्की, कांचनताई देरकर, रिताताई पहापळे, अर्चनाताई पिदुरकर, वर्षाताई खाडे, शामाताई तोटावार, सीमाताई खाडे, सविताताई आवारी, सुरेखाताई ढेंगळे व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वस्तूंपेक्षाही आपुलकीच्या दोन शब्दांनी आणि सन्मानाने या महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान या उपक्रमाचे खरे यश मानले जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए