सिटी हब मिडिया वणी…
विदर्भातील प्रसिद्ध व्यापारी केंद्र आणि सामाजिक सलोख्यासाठी ओळखले जाणारे वणी शहर हे खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाचे प्रतीक आहे. येथे सर्व धर्मीय बांधव एकमेकांच्या सुख-दुःखात आणि सणासुदीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व कांग्रेस नेते ईजहार शेख यांनी केले. पवित्र रमजान ईदच्या निमित्ताने ईजहार शेख आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने समस्त वणीकर जनतेला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

यावेळी बोलताना ईजहार शेख म्हणाले की, “वणी शहरात एकता आणि बंधुभाव मोठ्या प्रमाणात आहे. रमजानचा पवित्र सण असो वा इतर कोणतेही सण, सर्व धर्मीय बांधव ते एकत्र येऊन साजरे करतात. अल्लाकडे माझी हीच प्रार्थना आहे की, आपल्या वणीतील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य निरोगी राहो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि सर्वांचे जीवन आनंदाने भरून जावे.”
नगरसेवक आणि मान्यवरांचा शुभेच्छांत सहभाग
ईजहार शेख यांच्या या उपक्रमात त्यांच्या मित्र परिवारातील अनेक दिग्गज लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवून वणीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.
यामध्ये:
सैफूर रहमान (नगरसेवक, प्रभाग क्र. १३)
अलकाताई मोहोळ (नगरसेविका, प्रभाग क्र. १३)
करुणाताई कांबळे (माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका, प्रभाग क्र. ६)
अब्दुल हफीज उर्फ टापू (नगरसेवक, प्रभाग क्र. ९)
गुलाम रसूल रंगरेज (नगरसेवक, प्रभाग क्र. १४)
दिलीप मालेकर सर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते)
सुधीर पेटकर (सामाजिक कार्यकर्ते)
नईम अजिज (सामाजिक कार्यकर्ते)
या सर्व मान्यवरांनी ‘रमजान’ निमित्त शहरात शांतता, समृद्धी आणि प्रेम वृद्धिंगत व्हावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

























