सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
भारतीय जनता पार्टी यवतमाळ माजी जिल्हाध्यक्ष तथा वणीचे माजी नगराध्यक्ष मा. श्री. तारेंद्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, ४ एप्रिल रोजी वणी शहरात विविध सामाजिक आणि विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून केवळ जल्लोष न करता समाजातील विविध घटकांना मदत करण्याच्या भावनेतून कार्यकर्त्यांनी सेवाकार्याचा विडा उचलला आहे.
उद्या दिवसभरात खालीलप्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे:
१. गौमातेला चारा वाटप (सकाळी ८:३० वाजता)
दिवसाची सुरुवात ‘गौसेवेने’ होणार आहे. शालिक उरकुडे मित्र परिवारातर्फे गंगाविहार गौरक्षण, वणी येथे गौमातेला चारा वाटप करण्यात येणार आहे.
२. रुग्णसेवेचा संकल्प: फळ वाटप (सकाळी १०:०० वाजता)
रुग्णांच्या प्रति आपली संवेदनशीलता जपण्यासाठी निखील खाडे मित्र परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालय, वणी येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे.
३. शैक्षणिक मदत: पुस्तक वाटप (सकाळी ११:०० वाजता)
क्रांतिवीर बिरसामुंडा नगर परिषद शाळा क्रमांक ९, वणी यांच्या वतीने शाळेच्या आवारातच विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
४. वाचनालयाला बळकटी: पुस्तक वाटप (दुपारी १२:०० वाजता)
वैभव मांडवकर मित्र परिवारातर्फे स्वामी विवेकानंद वाचनालय, वणी येथे पुस्तक वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मा. तारेंद्र बोर्डे यांच्या नेतृत्वावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

























