सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
नियोजन विभागांतर्गत येणाऱ्या विविध कामांसाठी नागरिकांनी कोणत्याही व्यक्तीसोबत कसलाही आर्थिक व्यवहार करू नये, असे जाहीर आवाहन नियोजन विभाग सभापती लक्ष्मण म. उरकुडे यांनी एका सूचनेद्वारे केले आहे. प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार, नियोजन विभागांतर्गत येणारी कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी किंवा इतर शासकीय कामे ही पूर्णपणे शासन निर्णयानुसार आणि निर्धारित शुल्कानुसारच केली जातात. या प्रक्रियेत बाहेरील व्यक्तींचा हस्तक्षेप किंवा अनधिकृत आर्थिक मागणीला थारा नाही.
पैसे मागणाऱ्यांची खैर नाही!
जर एखादी व्यक्ती कोणत्याही कामाच्या बदल्यात पैशांची मागणी करत असेल, तर अशा प्रकाराला खतपाणी न घालता नागरिकांनी थेट संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “जर कोणी कामाच्या बदल्यात आर्थिक मागणी करीत असेल, तर तत्काळ माझ्याशी संपर्क साधावा,” असे स्पष्ट निर्देश लक्ष्मण उरकुडे यांनी दिले आहेत.

नागरिकांसाठी संपर्क क्रमांक:
भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी नागरिकांनी सहकार्य करावे आणि तक्रार असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
नाव: लक्ष्मण म. उरकुडे (सभापती, नियोजन विभाग)
संपर्क क्रमांक: ९३७२४८८४३२
या निर्णयामुळे मध्यस्थांच्या (एजंट) सुळसुळाटाला चाप बसणार असून, सर्वसामान्य नागरिकांची कामे विनासायास होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

























