Homeक्राइमसोशल मीडियावरील मैत्री वणीच्या महिलेला पडली महागात: प्रियकराकडून महिलेचा छळ; पुसदच्या तरुणाला...

सोशल मीडियावरील मैत्री वणीच्या महिलेला पडली महागात: प्रियकराकडून महिलेचा छळ; पुसदच्या तरुणाला अटक!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

 सोशल मीडियावरून निर्माण झालेल्या ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि पुढे शारीरिक संबंधात झाले, मात्र हेच नाते एका महिलेसाठी आता मानसिक आणि कायदेशीर पेच ठरले आहे. संबंध तोडल्याच्या रागातून महिलेला धमकावणाऱ्या आणि मानसिक छळ करणाऱ्या पुसद येथील तरुणाला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

ओळख, प्रेम आणि शारीरिक संबंध…

मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथील ३६ वर्षीय विवाहित महिलेची इंस्टाग्राम चॅटिंगच्या माध्यमातून पुसद येथील तुषार गजानन काकडे (वय २७) याच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला साध्या असलेल्या या संवादाचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. १५ ऑक्टोबर २०२४ ते २६ एप्रिल २०२६ या कालावधीत दोघांच्या भेटीगाठी वाढत गेल्या. वणी, नागपूर, भोपाळ आणि पुणे अशा विविध ठिकाणी या दोघांमध्ये वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

नातं तोडण्याचा निर्णय आणि धमक्यांचे सत्र..

काही काळानंतर महिलेने तुषारला सांगितले की, “मला आता हे संबंध पुढे वाढवायचे नाहीत, त्यामुळे आपण आपले मार्ग वेगळे करूया.” मात्र, हा निर्णय तुषारला मान्य नव्हता.तिने त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला परंतु त्याने  वेगवेगळ्या नंबरवरून मैसेज पाठवत महिलेला त्यांच्या खाजगी क्षणांचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर, “मी सर्व चॅटिंग तुझ्या पतीला पाठवेन” आणि “मी आत्महत्या करून तुझे नाव त्यामध्ये गुंतवीन” अशी भीतीदायक धमकी देऊन त्याने महिलेचा मानसिक छळ सुरू केला.

पोलीस कारवाई आणि अटक…

या सततच्या त्रासामुळे संबंधित महिलेने २७ एप्रिल २०२६ रोजी वणी पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार नोंदवली. वणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई केली. रात्री ३ वाजता पोलीस पथक रवाना झाले आणि सकाळी १० वाजता आरोपी तुषार काकडे याला वणीमध्ये हजर करून अटक करण्यात आली. आरोपीला सध्या तुरुंगात ठेवण्यात आले असून, पोलिसांनी त्याची न्यायालयीन कोठडी (MCR) मिळवण्यासाठी कोर्टाकडे मागणी केली आहे.

गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल…

वणी पोलिसांनी या प्रकरणी अपराध क्रमांक ३२०/२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(१), ३५१(२), ३५१(३) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (Atrocities Act) कलम ३८१ w(i), ३८१ w(ii), ३८२ (va), ३८२(v), ३(२)(va) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी सुरेश दळवे व त्यांचे पथक करीत आहे.

सावधानता: सोशल मीडियावरून निर्माण होणाऱ्या नात्यांचा हा धोकादायक पैलू पुन्हा एकदा समोर आला आहे. आभासी जगातील जवळीक किती महाग पडू शकते, याचे हे उदाहरण असून खाजगी माहिती शेअर करताना महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए