सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
महाराष्ट्र राज्याच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज वणी नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नगर परिषदेचे उपाध्यक्ष मा. श्री. राकेशजी बुग्गेवार यांच्या हस्ते सकाळी ठीक ७:०५ वाजता मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

प्रशिक्षणा निमित्त नगराध्यक्षांची अनुपस्थिती…
नियोजित कार्यक्रमानुसार नगराध्यक्षा मा. विद्याताई खेमराज आत्राम ध्वजारोहण करणार होत्या, मात्र त्या पुणे येथील ‘यशदा’ संस्थेत प्रशिक्षणासाठी गेल्या असल्याने त्यांनी ही जबाबदारी पार पाडण्याची विनंती उपाध्यक्ष राकेश बुग्गेवार यांना केली होती. त्यानुसार आजचा हा सोहळा पार पडला.
दिमाखदार सोहळा…
ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले आणि उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी बोलताना राकेश बुग्गेवार यांनी उपस्थित सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नगर परिषदेच्या वतीने शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाचे थोडक्यात तपशील:
वेळ: सकाळी ७:०५ वाजता
स्थळ: नगर परिषद कार्यालय प्रांगण, वणी
प्रमुख उपस्थिती: नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक,न.प.अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठित नागरिक.
या सोहळ्यामुळे नगर परिषद परिसरात सकाळपासूनच उत्साहाचे वातावरण होते.

























