सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका सराईत गुन्हेगाराला अटक करून मारेगाव पोलीस ठाण्यांतर्गत झालेली ९ लाख ३० हजार रुपयांची घरफोडी उघडकीस आणली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचे धागेदोरे हाती लागले आहेत.

नेमकी घटना काय?
मारेगाव पोलीस ठाण्यात २१ एप्रिल २०२६ रोजी नोंदवलेल्या एका गुन्ह्यात (अ.क्र. १४२/२०२६) यापूर्वी २१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या गुन्ह्यात नथ्थू नागू कुरकुटे (वय ३० वर्षे, रा. मोहदरी ता. उमरखेड) हा आरोपी फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते.
अशी झाली अटक…
१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, नथ्थू कुरकुटे हा पुसद-उमरखेड रोडवरील कोपरा फाटा परिसरात आहे. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे सोन्या-चांदीचे दागिने मिळून आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मारेगाव परिसरातून हे दागिने चोरल्याची कबुली दिली.
जप्त केलेला मुद्देमाल…
आरोपीकडून ९,३०,३०८/- रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
हा मुद्देमाल मारेगाव पोलीस ठाण्यातील दुसऱ्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील (अ.क्र. १६०/२०२६) असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार
ही धडाकेबाज कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली खालील पथकाने यशस्वीरित्या पार पाडली:
श्री. सतीश चवरे (पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.)
सपोनि दत्ता पेंढकर
पोउपनि धनराज हाके
पोलीस अंमलदार:
सुनील खंडागळे
सुधीर पांडे
सुभाष जाधव
संतोष भोरगे
तेजाब रणखांब
रजनिकांत मडावी
सतीश फुके (चालक)

























