सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
कटारिया ट्रेडर्सची साठ वर्षांची अखंड सेवा आता नव्या वास्तूत…
शहरातील ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले आणि दर्जेदार किराणा सामानासाठी प्रसिद्ध असलेले कटारिया ट्रेडर्स आता नव्या ठिकाणी स्थलांतरित होत असून नव्या रूपात व आधुनिक सुविधांसह ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. गेल्या साठ वर्षांपासून प्रामाणिक सेवा, गुणवत्ता आणि ग्राहक समाधान या तत्त्वांवर कार्यरत असलेल्या या प्रतिष्ठानाची सेवा परंपरा आता नव्या वास्तूमध्येही अविरत सुरू राहणार आहे.
आज दिनांक ८-५-२०२६ शुक्रवार रोजी भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे…
गांधी चौक परिसरात अनेक वर्षे ग्राहकांचा विश्वास जिंकणारे कटारिया ट्रेडर्स आता अधिक प्रशस्त आणि सुविधायुक्त ठिकाणी सुरू होत आहे. ठोक व चिल्लर दरात एकाच छताखाली दर्जेदार किराणा साहित्य उपलब्ध करून देणारे हे प्रतिष्ठान ग्राहकांसाठी नेहमीच विश्वासाचे केंद्र राहिले आहे.
नवीन दुकानामध्ये अन्नधान्य, मसाले, खाद्यतेल, सौंदर्यप्रसाधने, सुकामेवा तसेच विविध प्रकारचे दर्जेदार किराणा साहित्य उपलब्ध राहणार असून ग्राहकांना उत्तम दर्जा आणि योग्य दर यांची खात्रीशीर हमी दिली जाणार आहे.

कटारिया ट्रेडर्सचा नवीन पत्ता उषा हाईट्स, जैन मंदिर रोड, टायटन शोरूमच्या बाजूला, खाडे कृषी केंद्रासमोर, वणी असा आहे.
याबाबत कटारिया ट्रेडर्सचे संचालक रोशन कटारिया यांनी सांगितले की, “गेल्या साठ वर्षांपासून ग्राहकांनी आमच्यावर जो विश्वास ठेवला, त्याच विश्वासाच्या बळावर आम्ही नव्या वास्तूमध्ये नव्या उत्साहाने सेवा सुरू ठेवत आहोत. ग्राहकांना दर्जेदार वस्तू आणि समाधानकारक सेवा देण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू.”
साठ वर्षांच्या विश्वासाची परंपरा जपत कटारिया ट्रेडर्स आता नव्या जागेत नव्या उमेदीने ग्राहकांच्या सेवेत दाखल होत असल्याने ग्राहकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


आज दिनांक ८-५-२०२६ शुक्रवार रोजी भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे…






















