Homeमहाराष्ट्रबगीचे, नाले, सिमेंट रस्ते… प्रभागातील विकासाची पावती जनता देईल : नितीन चहानकर

बगीचे, नाले, सिमेंट रस्ते… प्रभागातील विकासाची पावती जनता देईल : नितीन चहानकर

-

[gtranslate]

Advertisementspot_img

प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष उमेदवार म्हणून नितीन चहाणकर यांनी निवडणुकीच्या रिंगणात प्रवेश केला आहे. यापूर्वी ते भाजपचे नगरसेवक होते; मात्र या वेळेस भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.

नितीन चहानकर यांचा दावा आहे की त्यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे केली असून, जनतेकडून त्याच कामांची पावती विजयाच्या स्वरूपात मिळेल, असा त्यांना विश्वास आहे.

त्यांनी प्रभागात बगीचे उभारणे, पक्क्या नाल्यांची निर्मिती, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची उभारणी, पाईपलाईन टाकून पाण्याची सोय, तसेच इतर मूलभूत सुविधांची निर्मिती केली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवत, कुठलीही समस्या उद्भवल्यास तिचे तात्काळ निराकरण करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नितीन चहानकर यांच्या समर्थकांचा दावा आहे की प्रभागातील लोकप्रिय नाव म्हणून त्यांना मोठा जनसमर्थन लाभत असून, त्यांनी केलेल्या कामांच्या बळावर यंदा देखील मतदारांचा विश्वास त्यांच्यावरच राहील.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए