Homeमहाराष्ट्रबाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीमध्ये युवासेने तर्फे भव्य मॅराथॉन स्पर्धा; उत्स्फूर्त जनसहभाग!

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त वणीमध्ये युवासेने तर्फे भव्य मॅराथॉन स्पर्धा; उत्स्फूर्त जनसहभाग!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरात भव्य मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज (शिवतीर्थ), वणी येथून भगवा ध्वज फडकावत छत्रपती शिवाजी महाराजांना हार अर्पण करून या मॅराथॉनला उत्साहात सुरुवात झाली. मोठ्या जनसहभागात ही स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली.

या मॅराथॉन स्पर्धेत युवक, युवती, बालकांसह क्रीडाप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धा एकूण चार गटांत घेण्यात आली.

ओपन गट (मुले) मध्ये विरोचन गोडे यांनी प्रथम, सौरभ दरणे यांनी द्वितीय, शिवम जंगठे यांनी तृतीय तर पियूष पडलमवार यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला.

ओपन गट (मुली) मध्ये गौरी पांगुळ प्रथम, प्रशांती वसाके द्वितीय, अचल झिले तृतीय तर समीक्षा हनमंते चतुर्थ ठरल्या.

१६ वर्षांखालील गट (मुले) मध्ये शिवम ओझा प्रथम, शिवम कुइटे द्वितीय, सुमित ढेंगळे तृतीय तर अयान सिद्दिकी चतुर्थ क्रमांकावर राहिला.

१६ वर्षांखालील गट (मुली) मध्ये नव्या पिदुरकर प्रथम, पल्लवी ठाकरे द्वितीय, जानवी ठाकरे तृतीय तर श्रद्धा देशमुख यांनी चतुर्थ क्रमांक मिळवला.

विजेत्या सर्व स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व आकर्षक स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेदरम्यान शिस्तबद्ध आयोजन, योग्य सुरक्षितता व्यवस्था आणि उत्साही वातावरण याचा प्रत्यय नागरिकांना आला.

हा उपक्रम वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयभाऊ देरकर व किरणताई देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाप्रमुख संजयजी निखाडे यांच्या नेतृत्वात पार पडला. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नव्याने निवडून आलेले नगरसेवक यांचा शाल व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे मुख्य आयोजन व नेतृत्व युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य सु. शेंडे यांच्या वतीने करण्यात आले. या मॅराथॉनमुळे युवकांमध्ये आरोग्याची जाणीव, क्रीडासंस्कृती व सामाजिक ऐक्याचा संदेश पोहोचल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे आयोजकांकडून आभार मानण्यात आले.

या वेळी शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये डॉ. संचिताताई नगराळे, सुरेखाताई ढेंगळे, दीपक कोकास, सुनील कातकडे, गणपत लेडांगे, आयुष ठाकरे, रवी बोढेकर, विनोद दुमणे, सुरेश शेंडे, राजू तुराणकर, अजय चन्ने, डॉ. विलास बोबडे, टिकाराम खाडे, बबन केळकर, राजू पाटील, चेतन उलमले, मिलिंद बावणे, संजोग झाडे, कुणाल खामकर, अक्षय लाडे व संस्कार हेपट यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी महिला नगराध्यक्षचा अपमान???
02:32
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए