Homeक्राइमदुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण; जत्रा मैदान परिसरातील घटना!

दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण; जत्रा मैदान परिसरातील घटना!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

घराकडे पायी जात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाला अडवून, त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वणी येथील जत्रा मैदान परिसरात उघडकीस आली आहे. आरोपीच्या सांगण्यानुसार दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून दोन जणांनी या सुरक्षा रक्षकाला लाठ्या-काठ्यांनी आणि बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पीडित व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे.

रामपुरा वॉर्ड येथील रहिवासी असलेले रवी राजेश घुगरे (वय ३१) हे अकोला को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत सुरक्षा रक्षक (सिक्युरिटी गार्ड) म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी (१४ जुलै) नेहमीप्रमाणे आपली ड्युटी संपवून ते रंगारीपुरा येथे राहणाऱ्या आपल्या बहिणीकडे जेवणासाठी गेले होते. रात्री साडेदहाच्या सुमारास जेवण आटोपून ते पायी आपल्या घराकडे निघाले होते.

ते जत्रा मैदान परिसराजवळ पोहोचले असता, मैलगडा येथील रहिवासी असलेल्या आकाश (वय अंदाजे २८ वर्षे) नावाच्या युवकासोबत त्यांची गाठ पडली. आकाशने रवी यांना जबरदस्तीने आपल्या मोटारसायकलवर बसण्याचा आग्रह केला. मात्र, रवी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला.

लाठ्या-काठ्यांनी हल्ला अन् जीवे मारण्याची धमकी:

नकार ऐकताच संतप्त झालेल्या आकाश आणि त्याच्यासोबत असलेल्या एका अनोळखी मित्राने वाद घालण्यास सुरुवात केली. रागाच्या भरात दोघांनी हातातील काठीने रवी यांच्या तोंडावर आणि पायावर सपासप वार केले. इतकेच नव्हे तर त्यांना खाली पाडून लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली.या गंभीर मारहाणीमुळे रवी यांच्या तोंडातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव सुरू झाला.

मारहाणीदरम्यान रवी यांनी आरडाओरडा केल्याने त्यांचे काही मित्र धावत घटनास्थळी आले आणि त्यांनी मध्यस्थी करत भांडण सोडवले. यावेळी आरोपी आकाशने, “जर या प्रकरणाची पोलिसात तक्रार केली, तर तुला जीवे मारून टाकेन,” अशी थेट धमकी दिली.

दोन जणांवर गुन्हा दाखल:

घटनेनंतर जखमी रवी घुगरे यांना तातडीने उपचारासाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वणी पोलीस ठाणे गाठून घटना सांगितली.

रवी यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी आकाश आणि त्याच्या अज्ञात साथीदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ११५(२), ११८(१), ३५१(२), ३५१(३) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत.

(बातमीत एआई इमेज वापरली आहे…)

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए