Homeविदर्भवणीवणीतील बारमध्ये तोडफोड, मालकासह मॅनेजर जखमी; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वणीतील बारमध्ये तोडफोड, मालकासह मॅनेजर जखमी; 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

-

[gtranslate]

Advertisementspot_img

वणी: शहरातील न्यू ज्योती बारमध्ये शनिवारी (13 सप्टेंबर) दुपारी 1.30 वाजता आठ ते दहा महिलांनी प्लास्टिक पाईप आणि लाकडी दांडक्यांसह प्रवेश करत तोडफोड केली. या हल्ल्यात बारचे मालक मनोज उरकुडे आणि मॅनेजर आशिष खाडे जखमी झाले. याप्रकरणी वणी पोलिसांनी चार महिलांसह आठ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेची सुरुवात शुक्रवारी (12 सप्टेंबर) सायंकाळी 6 वाजता झाली, जेव्हा शेखर अशोक दुर्गमवार नावाचा व्यक्ती आपल्या मित्रासह बारमध्ये दारू पिण्यासाठी आला होता. दारू पिल्यानंतर त्याने बिल भरता पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बार कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले. शेखरने पैसे नसल्याचे सांगितल्यावर, त्याने आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले, ज्यांनी  बिल भरले. मात्र, जाताना त्याने बार मालकालाउद्या बघ, तुला आयुष्यभर लक्षात राहीलअशी धमकी दिली.

दुसऱ्या दिवशी, शनिवारी दुपारी 1.30 च्या सुमारास, आठ ते दहा महिलांनी बारमध्ये प्रवेश केला. त्यांनी बार मालक मनोज उरकुडे यांच्यावर शिवीगाळ करत हल्ला केला. हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात तिखट पावडर फेकली, ज्यामुळे त्यांना काही काळ अंधत्व आले. त्यानंतर त्यांनी मारहाण करत त्यांना खाली ओढले. या हल्ल्यात मनोज उरकुडे यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर मार लागला.

दरम्यान, काउंटरवर बसलेले मॅनेजर आशिष खाडे यांनाही महिलांनी लक्ष केले. त्यांच्यावर काचेचे ग्लास फेकल्याने तेही जखमी झाले. या घटनेनंतर मनोज उरकुडे यांनी वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजूर कॉलरी येथील 3 महिला, वरोरा येथील 1 महिला आणि इतर 4 असे एकूण 8 जणांवर भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 नुसार कलम 189(2), 191(2), 190, 118(1), 115(2), 296, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए