Homeमहाराष्ट्रवणी नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व; उबाठा व काँग्रेसकडून अनुभवी गटनेते घोषित!

वणी नगरपालिकेत भाजपचे वर्चस्व; उबाठा व काँग्रेसकडून अनुभवी गटनेते घोषित!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

वणी नगरपरिषद निवडणूक 2025 : भाजप स्पष्ट बहुमतासह सत्तेत, उबाठा–काँग्रेसला मर्यादित यश; अनुभवी गटनेत्यांकडे विकासाची धुरा…

वणी नगरपरिषद निवडणूक 2025 मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पद जिंकत, सोबतच 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत नगरपालिकेवर एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे. या निवडणुकीत उबाठा शिवसेनेला 6 तर काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे उबाठा शिवसेना व काँग्रेस यांनी एकत्र येत 29 जागांसाठी निवडणूक लढवली होती; मात्र त्यांना मिळून फक्त 9 जागांवरच यश मिळाले. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून उबाठा शिवसेनेने प्रभाग क्रमांक 8 मधील विजयी उमेदवार सुधीर थेरे यांची नगरपालिकेतील गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे. तर काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक 6 मधून विजयी झालेल्या तसेच माजी नगराध्यक्ष करुणा कांबळे यांची काँग्रेस गटनेता म्हणून नियुक्ती केली आहे.

यापूर्वी भाजपने प्रभाग क्रमांक 4 चे नगरसेवक राकेश बुग्गेवार यांची भाजप गटनेता म्हणून निवड करून सत्ताधारी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. गटनेता ही भूमिका केवळ पक्षीय नसून सत्ताधारी व विरोधकांमध्ये समन्वय साधणारी, विकासकामांना गती देणारी महत्त्वाची जबाबदारी मानली जाते.

उबाठा गटनेते सुधीर थेरे यांना नगरपरिषद राजकारणाचा मोठा अनुभव आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी अर्चना थेरे या सुद्धा माजी नगराध्यक्ष राहिल्या असून, त्यामुळे थेरे कुटुंबाला नगरपालिकेच्या प्रशासनाचा सखोल अनुभव आहे. दुसरीकडे काँग्रेस गटनेत्या करुणा कांबळे या स्वतः माजी नगराध्यक्ष असल्याने नगरपरिषदेच्या कामकाजाची, निधी वितरणाची व विकास प्रक्रियेची त्यांना उत्तम जाण आहे.

भाजपकडे स्पष्ट बहुमत असून उपाध्यक्षपद, स्वीकृत सदस्य नियुक्तीचे अधिकारही भाजपकडेच राहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात नगरपालिकेतील निर्णयप्रक्रियेत भाजपचे वर्चस्व राहणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे उबाठा व काँग्रेसने निवडणूक प्रचारात स्वतंत्र वाटचाल केल्याचा फटका निकालात स्पष्टपणे दिसून आला.

आता गटनेत्यांच्या नियुक्तीनंतर नगरपालिकेतील प्रशासन कशा प्रकारे चालते, विकास निधी आपल्या-आपल्या प्रभागात आणण्यात हे गटनेते किती प्रभावी ठरतात आणि सत्ताधारी भाजपसोबत समन्वय साधून वणीच्या सर्वांगीण विकासासाठी कसे काम केले जाते, याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे. अनुभवी नेतृत्वाचा उपयोग शहराच्या विकासासाठी व्हावा आणि निवडणुकीदरम्यान दिसलेली राजकीय तुटातूट नगरपालिकेच्या कामकाजात अडथळा ठरू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए