Homeमहाराष्ट्रआपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी TDRF अधिकारी मुस्कान सैय्यद यांचा प्रशासनातर्फे गौरव!

आपत्ती व्यवस्थापनातील उत्कृष्ट कार्यासाठी TDRF अधिकारी मुस्कान सैय्यद यांचा प्रशासनातर्फे गौरव!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

TDRF च्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी मुस्कान ज. सैय्यद यांचा प्रशासनातर्फे गौरव…

आपत्ती व्यवस्थापनातील उल्लेखनीय शैक्षणिक व सामाजिक योगदानाची दखल…

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपविभागीय कार्यालय, वणी यांच्या वतीने शासकीय मैदानावर आयोजित ध्वजारोहण समारंभानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल Target Disaster Response Force (TDRF) च्या मुख्य क्षेत्रीय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुस्कान परविन जलील सैय्यद यांचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

हा सन्मान सन 2025–26 या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी उपविभागीय अधिकारी मा. नितीनकुमार हिंगोले यांच्या हस्ते, तसेच तहसीलदार वणी मा. निखिल धूळधर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमास वणीचे आमदार संजय देरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे, माजी आमदार बोदकुलवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

TDRF संचालक मा. श्री. हरिश्चंद्र बद्रीनाथ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असताना मुस्कान सैय्यद यांनी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात प्रशासकीय कामकाजासोबतच शैक्षणिक व सामाजिक पातळीवर उल्लेखनीय योगदान दिले आहे. SCERT, पुणे येथे युनीसेफ व शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन वाचन साहित्य निर्मिती कार्यशाळेत त्यांनी सहभाग घेतला असून, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वाचन साहित्यात त्यांच्या कार्याचा समावेश करण्यात आला आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने त्या दरवर्षी वृक्षारोपण करून त्याचे संगोपन स्वतः करतात. हरितक्रांती दिनानिमित्त २०० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड व वाटप, तसेच ‘हर घर तिरंगा’ या राष्ट्रीय अभियानातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी मा. अमोल येडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.

कोविड-१९ महामारीच्या काळात वणी तहसील प्रशासनासोबत समन्वयाने केलेल्या कार्याची दखल घेत यापूर्वीही प्रशासनाकडून त्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे.

गेल्या पाच वर्षांपासून यवतमाळ जिल्हा व वणी तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण, देशभक्तीपर जनजागृती, आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांचा सन्मान, स्वच्छता मोहिमा, रक्तदान शिबिरे यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांत त्या सातत्याने सक्रिय असून समाजाला व राष्ट्रकार्याला प्रेरणा देण्याचे कार्य करीत आहेत.

या सन्मानाचे श्रेय TDRF संचालक मा. श्री. हरिश्चंद्र राठोड, सहाय्यक संचालिका श्रीमती रुपाली राठोड, संपूर्ण TDRF परिवार तसेच सैय्यद परिवार यांना देत असल्याचे मत मुस्कान सैय्यद यांनी व्यक्त केले.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
संधी आणि वेळ आहे, जीवनदायी निर्गुडेला जीवनदान द्या वणीकरांची हाक...
04:08
Video thumbnail
शाम बिहारी का चटपटा चना जोर गरम..,
01:18
Video thumbnail
"जनगणना का महत्त्वाची? एका दुकानदाराचा अनुभव!""एक जागरूक नागरिक, एक पाऊल देशासाठी! 🇮🇳"
03:11
Video thumbnail
कांग्रेसला बळकटी देण्याचा संकल्प,प्रदेश कांग्रेस सचिव संजय खाडे यांचा वाढदिवशी निर्धार...
07:26
Video thumbnail
किला शानदार लेकिन इतिहास खतरनाक,क्या है अंबागड किले का इतिहास देखिए इस विडीयो में।
10:38
Video thumbnail
वणी तहसील व पोलिस प्रशासनाचे भूखंड गैरव्यवहारातील आरोपींना अभय???
02:53
Video thumbnail
पोलिस आणि पत्रकार एकता,बघा मग काय घडलं वणी पोलिस स्टेशनमध्ये,आरोपींना वाचवण्यासाठी फोन वर फोन...
15:29
Video thumbnail
देशभक्ति भी और देहभक्ति भी।
00:34
Video thumbnail
वणीत 'ऑपरेशन मिड नाईट'चा थरार! ३४ गोवंशांना मिळाले जीवदान, बकरीद वर वाढते गौतस्करी???
10:07
Video thumbnail
वणीच्या बजरंग दलाचे मिशन मिडनाईट...
01:20
Video thumbnail
वणी शहराच्या मधोमध असलेली ही ऐतिहासिक वास्तू घाणीच्या विळख्यात शेवटच्या घटका मोजत आहे...
06:48
Video thumbnail
शेतकऱ्यांच्या पिक विमा भरपाई लवकरात लवकर द्या, नाही तर कोर्टात खेचणार- विजय पिदुरकर...
03:04
Video thumbnail
वणीतील १३,३१२ शेतकऱ्यांचा विमा कुणी गिळला? ५६ कोटींचा हिशोब द्या,विजय पिदुरकर कडाडले...
09:55
Video thumbnail
दोस्ती पर चला हथौड़ा, सर पर वार दोस्त को किया गंभीर जख्मी।
01:24
Video thumbnail
इंस्टाग्राम पर दोस्ती, प्यार और ब्लॅकमेलिंग।
01:39
Video thumbnail
"आता सहन करणार नाही! घरकुल लाभार्थी थेट रेती घाटावर जाणार?"
04:47
Video thumbnail
राज्यातील कृषी साहित्य विक्रेता संघ बेमुदत संप का करताय ? जाणून घ्या या विडिओ मध्ये...
06:09
Video thumbnail
दिव्यांगो की सेवा,शिक्षा,रोजगार के लिए अथक प्रयास।श्री रामदेव बाबा अपंग मुकबधिर विद्यालय वणी।
13:08
Video thumbnail
मराठी चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याशी खास मुलाखत...
07:51
Video thumbnail
राजकीय श्रेयासाठी रस्सीखेच,निधी व विकासासाठी कुणी किती निधी आणला यासाठी होऊ द्या आमनेसामने चर्चा...
08:54
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए