Homeक्राइममहाशिवरात्रीला शिबला गावात रक्ताचा सडा; किरकोळ वादातून शेजाऱ्याचा खून, पत्नी गंभीर जखमी!

महाशिवरात्रीला शिबला गावात रक्ताचा सडा; किरकोळ वादातून शेजाऱ्याचा खून, पत्नी गंभीर जखमी!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

महाशिवरात्रीचा उत्साह सुरू असतानाच झरी तालुक्यातील शिबला गावात एक अत्यंत थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. संशयाच्या जाळ्यातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले असून, एका ४६ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिबला येथील रहिवासी संतोष टेकाम (४६) आणि त्यांचे शेजारी शालीक आत्राम (३५) यांच्यात सोमवारी (१६ फेब्रुवारी) किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. संतोष टेकाम हा महाशिवरात्रीच्या पुजेची तयारी करत असतानाच अचानक शालिक आत्राम याने हल्ला संतोष वर अमानुष हल्ला केला व सुऱ्याने सपासप वार करत संतोषचा खून केला संतोषला बचावची संधी सुद्धा मिळाली नाही.हल्ला इतका निर्घृण होता की संतोषच्या हाताचा पंजा वेगळा झाला व शिर ही धडापासून ही वेगळा करण्याचा प्रयत्न केला.

जागीच मृत्यू: सुऱ्याचे वार वर्मी लागल्याने संतोष टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

पत्नीवरही हल्ला: पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष यांच्या पत्नीवरही आरोपीने वार केले. त्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलीस कारवाई आणि बंदोबस्त

घटनेची कुणकुण लागताच पाटण पोलिसांनी तातडीने शिबला गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवशी गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.

खूनानंतर आरोपी शालिक पळून गेला परंतु पोलिसांनी काही तासांतच त्याला मार्थार्जुन इथून अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या…

सुरक्षा उपाय: उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सध्या मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

गावात भीतीचे सावट

शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिबला गावात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे. किरकोळ संशयाने एका हसतखेळत कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Video thumbnail
जनप्रतिनिधी गप्प,कोलगाव साखरा रस्ता चिखलात!शेवटचा इशारा!९ जुलैला वेकोलीची कोळसा वाहतूक रोखणार.
02:55
Video thumbnail
WCL विरुद्ध वृद्ध शेतकरी दांपत्याचा लढा! न्यायासाठी विजय पिदुरकर मैदानात...
06:18
Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए