Homeमहाराष्ट्रयवतमाळात महाविकास आघाडीला मोठे भगदाड; वणी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे'शक्तिप्रदर्शन'

यवतमाळात महाविकास आघाडीला मोठे भगदाड; वणी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे’शक्तिप्रदर्शन’

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी…

राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असताना, यवतमाळ जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत, वणी विधानसभा क्षेत्रासह जिल्ह्यातील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील डझनाहून अधिक बड्या नेत्यांनी ‘नंदनवन’ निवासस्थानी भगवा हाती धरला.

बड्या नेत्यांचे ‘नंदनवन’वर आगमन…

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विशेष पुढाकाराने हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी वणी आणि परिसरातील अनेक मातब्बर नेत्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.

प्रवेश केलेले प्रमुख चेहरे:

आशिष खुळसंगे: माजी जिल्हा परिषद सदस्य व वसंत जिनिंगचे अध्यक्ष (काँग्रेसला मोठा धक्का).

दीपक कोकास: उपजिल्हाप्रमुख (शिवसेना उबाठा).

गजानन किनेकर: ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी तालुकाप्रमुख.

राजू तुरणकर व पंकज मुंडे: माजी नगरसेवक.

अजिंक्य शेंडे: युवासेना उपजिल्हाप्रमुख.

राजू वनकर व नितीन निघोट: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहर पदाधिकारी.

याव्यतिरिक्त डॉ. मारुती माशेलकर, शंकर पाचभाई, विलास निखाडे यांसारख्या स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागातही शिंदे गटाची पकड मजबूत झाली आहे.

वणी विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये सर्व आलबेल नसताना आता अनेक नेत्यांचा पक्ष त्याग उबाठा व कांग्रेसला चांगला फटका देणार असे चित्र निर्माण झाले आहे…

हा केवळ पक्षप्रवेश नसून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वणी विधानसभा मतदारसंघात झालेली मोठी राजकीय उलथापालथ मानली जात आहे. विशेषतः वणी, मारेगाव आणि झरी या तालुक्यांतील काँग्रेस आणि उबाठा गटाची फळी विखुरल्याने विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

“विकासाचे राजकारण आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी भावना नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन: ‘संघटन आणि विकास’ हीच ताकद

नवागतांचे स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “राज्यातील महायुती सरकार सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील या पक्षप्रवेशामुळे आमची ताकद वाढली असून, विकासकामे घराघरात पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे.”

उपस्थिती: या सोहळ्याला पश्चिम विदर्भ समन्वयक पराग पिंगळे, जिल्हा संपर्क प्रमुख हरीहर लिंगणवार, जिल्हाप्रमुख राजुदास जाधव, जिल्हाप्रमुख गजानन ढोमाळे, शहर प्रमुख निलेश बेलोरकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
स्वप्न दर्शन से स्थापना तक: वणी के जागृत हनुमान मंदिर का सच!
05:43
Video thumbnail
युपी व पुणेच्या पैलवानांना लोळत "वाशिमच्या विजय शिंदे वाघाने मैदान मारलं! 🏆 'माजी आमदार केसरी' २०२६
02:36
Video thumbnail
माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सहकार्याने वणी येथील जत्रा मैदानावर आयोजित कुस्ती महादंगल.
01:28
Video thumbnail
गावातील एका गटाकडून मुर्धोनी येथील सरपंच व तत्कालीन ग्रामसचिवावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप...
12:19
Video thumbnail
सिलेंडरचा साठा मुबलक आहे, अफवांवर विश्वास ठेवू नका... #maharashtra #waninews #wani
01:53
Video thumbnail
डॉ.हेडगेवार और महात्मा गांधी के बीच संघ के कार्य और उद्देश्य को लेकर हुई दिलचस्प बातें इस विडियोमें।
10:13
Video thumbnail
सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा ,मौलाना बोले भारत सबसे सुरक्षित ,शुक्रिया भारत सरकार।
05:33
Video thumbnail
महाराष्ट्र सरकार मार्गी लावणार DAV शाळेचा प्रश्न,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती.
05:56
Video thumbnail
DAV शाळेचा प्रश्न! महाराष्ट्र सरकारने दिली हमी,पुनवट ईथे शाळा स्थलांतरित करण्यात अडचण येणार नाही...
03:44
Video thumbnail
‌‌ वणीमध्ये रंगणार कुस्तीचा महासंग्राम!माजी आमदार केसरी कुस्ती महादंगल,वणीकरांसाठी कुस्तीचा थरार...
05:27
Video thumbnail
श्री श्याम बाबा के दर्शन और आरती घर पर देखे।
00:51
Video thumbnail
जय श्री श्याम, श्याम धाम वणी।
00:56
Video thumbnail
सिलेंडर की किल्लत? वणी के इस ढाबा मालिक ने निकाला ऐसा जुगाड़ कि अब कभी बंद नहीं होगा होटल...
06:03
Video thumbnail
वणीत कर्मशियल गॅस टंचाईचा हाहाकार! युद्धाच्या झळा आता थेट लग्नाच्या पंगतीला...
03:30
Video thumbnail
जिथे मैदान तिथे नाव फक्त 'विदर्भ केसरी रुबाब',, रुबाबचा वणी येथील शंकर पटातील रुबाबदार अंदाज. 🚩🔥
07:10
Video thumbnail
भरत नागपाल हत्याकांड: न्याय की मांग को लेकर सड़कों पर उतरा पंजाबी समाज | वणी में विशाल मुक मोर्चा।
04:51
Video thumbnail
श्रीगजानन एक अमृतानुभव लाईव्ह...
01:54:59
Video thumbnail
City Hub Media is live
07:16
Video thumbnail
"वणी की विरासत और हंसी का संगम"।
51:03
Video thumbnail
“हास्यकवी गौतम गुळधे यांचा वणीत धमाकेदार कार्यक्रम,महामूर्ख संमेलनात प्रेक्षक पोट धरून हसले”
32:08
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए