Homeखेलतलवार-दांडपट्टा प्रशिक्षणातून परंपरा जपणाऱ्या वणीच्या तेजस्विनी गव्हाणेचा यवतमाळ पोलिस मुख्यालयात महिला दिनानिमित्त...

तलवार-दांडपट्टा प्रशिक्षणातून परंपरा जपणाऱ्या वणीच्या तेजस्विनी गव्हाणेचा यवतमाळ पोलिस मुख्यालयात महिला दिनानिमित्त सन्मान!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी..

महिला दिनी पोलिस मुख्यालयात तेजस्विनी गव्हाणेचा सन्मान…

महिला दिनाच्या निमित्ताने यवतमाळ पोलिस मुख्यालयात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात वणी येथील पारंपरिक साहसी खेळांची प्रशिक्षक तेजस्विनी राजू गव्हाणे हिला जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

तेजस्विनी ही वणीतील सामाजिक कार्यात सक्रिय असलेले राजू देवरावजी गव्हाणे तसेच प्रभाग क्रमांक १४ ‘अ’ च्या नगरसेविका सौ. मनिषा राजू गव्हाणे यांची कन्या आहे. लहानपणापासूनच तिला पारंपरिक मर्दानी खेळांबद्दल विशेष आकर्षण होते. अवघ्या सातव्या वर्षी तिने आपल्या आजोबा वस्ताद देवरावजी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली लाठीकाठी आणि तलवारबाजीचे प्राथमिक धडे घेतले.

यानंतर तिने नागपूर येथील प्रख्यात लाठीकाठी प्रशिक्षक वस्ताद आप्पासाहेब भोसले यांच्या ताजराज हिरा आखाड्यात पुढील प्रशिक्षण घेत आपल्या कौशल्यात अधिक प्रावीण्य मिळवले. प्रशिक्षणासोबतच तेजस्विनीने स्वतःचा एक गट तयार करून मुला-मुलींना लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा, बाणा आणि भाला यांसारख्या पारंपरिक युद्धकलेचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.

तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होत असून मर्दानी खेळांची परंपरा टिकवून ठेवण्यास हातभार लागत आहे. याशिवाय तेजस्विनी कराटे या खेळात ब्लॅक बेल्टधारक असून वकृत्व, कला आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्येही ती सक्रिय सहभाग नोंदवते.

तिच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महिला दिनानिमित्त यवतमाळ पोलिस प्रशासनाने तिचा विशेष सन्मान केला असून सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए