Homeविदर्भनागपुरवणीत घुमणार रामनामाचा जयघोष; २६ मार्च गुरुवारी निघणार भव्य शोभायात्रा! शेगावचे भजन...

वणीत घुमणार रामनामाचा जयघोष; २६ मार्च गुरुवारी निघणार भव्य शोभायात्रा! शेगावचे भजन मंडळ आणि हरियाणाचे ‘लाईव्ह हनुमान’ ठरणार आकर्षणाचे केंद्र!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सिटी हब मिडिया वणी:

जय श्रीराम…

मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून वणी शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री रामनवमी शोभायात्रा उत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. भक्ती, शक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या सोहळ्याने संपूर्ण वणी शहर राममय होणार आहे.

यंदाची विशेष आकर्षणे…

यावर्षीच्या शोभायात्रेचे नेतृत्व समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर करत असून, मिरवणुकीत अनेक नाविन्यपूर्ण देखावे पाहायला मिळणार आहेत:

अयोध्या दर्शन: अयोध्येतील रामललाची हुबेहूब जिवंत प्रतिमा.

लाईव्ह हनुमान: हरियाणा येथून आलेले विशेष ‘लाईव्ह हनुमान’ पथक.

भक्तीचा गजर: शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थानचे भजन मंडळ आणि इतर नामवंत भजनी मंडळांचे सादरीकरण.

लवाजमा: सुशोभित रामरथ, पालखी, घोडे आणि ठसकेबाज बँड पथके.

शोभायात्रेचा मार्ग आणि वेळ…

ही शोभायात्रा २६ मार्च (गुरुवार) रोजी सायंकाळी ५:०० वाजता जुन्या स्टेट बँकजवळील ऐतिहासिक राम मंदिरातून रामरथाच्या पूजनाने मार्गस्थ होईल.

भ्रमण मार्ग: राम मंदिर (जुनी स्टेट बँक) –शाम टॉकीज चौक — काळाराम मंदिर — श्री रंगनाथ मंदिर चौक– भगतसिंग चौक– गाडगेबाबा चौक –सर्वोदय चौक –टागोर चौक– तुटी कमान– गांधी चौक — खाती चौक– टिळक चौक — आंबेडकर चौक– समाप्ती: राम मंदिर (महाआरतीसह).

सहभागाचे आवाहन…

उत्सवाच्या यशस्वीतेसाठी समितीचे कार्याध्यक्ष प्रणव पिंपळे यांच्यासह कुंतलेश्वर तुरविले, संतोष डंभारे, मनोज सरमोकदम, कौशिक खेरा, आशिष डंभारे आणि उत्सव समितीचे सर्व सदस्य अहोरात्र परिश्रम घेत आहेत. या मंगलमयी सोहळ्यात वणीतील तमाम रामभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए