Homeक्राइमवडगाव भूखंड घोटाळा: मुख्य सूत्रधार सतीश केराम अखेर जेरबंद; महसूल अधिकारी अटकेपासून...

वडगाव भूखंड घोटाळा: मुख्य सूत्रधार सतीश केराम अखेर जेरबंद; महसूल अधिकारी अटकेपासून वाचले, पण चौकशीचा ससेमिरा कायम!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

बनावट सातबारा आणि बोगस फेरफारच्या साहाय्याने लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या वडगाव (धं) येथील जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी सतीश केराम याला वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील त्याचा साथीदार शैलेश वाकडे हा अजूनही पोलिसांना गुंगारा देत असून, पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या प्रकरणात नाव अडकलेल्या महसूल विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

📄 काय आहे संपूर्ण प्रकरण?

सूरज रमेश चाटे नावाच्या नागरिकाने वणी पोलीस ठाण्यात या फसवणुकीबाबत रीतसर तक्रार नोंदवली होती. आरोपी शैलेश वाकडे याच्या मालकीची नसलेली जागा त्याचीच असल्याचे भासवून, त्याला महसूल विभागातील बनावट कागदपत्रे, खोटा सातबारा आणि फेरफार जोडण्यात आले होते. शासकीय अधिकाऱ्यांनीच ही कागदपत्रे खरी असल्याचा निर्वाळा दिल्यामुळे फिर्यादीचा विश्वास बसला आणि त्यांनी १,२०,००० रुपयांचा व्यवहार केला. मात्र, काही दिवसांनी ती जमीन दुसऱ्याचीच असल्याचे समजताच आपल्याला फसवण्यात आल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

⚖️ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन…

या संपूर्ण रॅकेटमध्ये महसूल विभागाचे तलाठी रवींद्र उपरे आणि मंडळ अधिकारी राजू डोंगरे यांचे संगनमत असल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच अटक टाळण्यासाठी या दोन्ही अधिकाऱ्यांनी पांढरकवडा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने काही अटी व शर्ती घालत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यामुळे सध्यातरी त्यांची अटक टळली असली, तरी त्यांच्यावरील चौकशीची टांगती तलवार कायम आहे.

🔍 रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता…

पोलिसांनी मुख्य सूत्रधार सतीश केराम, शैलेश वाकडे आणि दोन्ही महसूल अधिकाऱ्यांवर फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे आणि शासकीय दप्तरात फेरफार केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. मुख्य आरोपी केरामच्या अटकेमुळे या रॅकेटची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे समोर येईल. तसेच फरार वाकडेच्या अटकेनंतर महसूल विभागातील आणखी काही संशयित चेहरे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
वारंवार निवेदन देऊनही जनप्रतिनिधी व लोकनिर्माण विभागाची झोप उघडेना,खराब रस्त्यांमुळे गावकरी संतप्त.
02:16
Video thumbnail
"विमा कंपन्या मालामाल, शेतकरी कंगाल?"विजय पिदूरकर यांचा पिक विमा कंपनीच्या धोरणाविरोधात लढा…
04:11
Video thumbnail
लोकांना भरभरून हसवणारा आज बाप आणि मुलाचं भावनिक नातं दाखवून डोळ्यात अश्रू आणतोय…
06:41
Video thumbnail
९१ वर्षाचे वारकरी वडगाव वणी येथील पंढरीकाका आसुटकर,दर्शन लाभले धन्य झालो जय हरी विठ्ठल…
02:47
Video thumbnail
वणीच्या ऐतिहासिक विहिरीचे पुरातत्व सर्वेक्षण होणार, वणीच्या इतिहासातील गुपिते बाहेर येणार...
02:40
Video thumbnail
वणीकरांची डोकेदुखी कोण व केव्हा दूर करणार कारण प्रशासन झोपेत आहे…
02:37
Video thumbnail
अभ्यासपूर्ण व तर्कसंगत पाठपुरावा असेल तर जनतेच्या हितासाठी योग्य परिणाम साधता येतो...
06:24
Video thumbnail
जे काम स्थानिक खासदारांचे ते काम मी करतोय,नागरिकांच्या हितासाठी मी सदैव तत्पर— सुधीर मुनगंटीवार…
05:49
Video thumbnail
कोळसा प्रदूषणाच्या मुद्द्यांवर गठीत विकास खारगे समिती समोर विजय पिदुरकर यांची जोरदार बॅटिंग...
11:13
Video thumbnail
खासदार संजय देशमुख यांचे कपडे फाडून कानपटीत शेकणार,उबाठा यवतमाळ जिल्हाध्यक्ष संजय निखाडे यांचा इशारा
01:03
Video thumbnail
ठाकरेंच्या शिवसेनेत खळबळ? आमदार संजय देरकर म्हणाले - मी कुणाच्याही संपर्कात नाही!
02:27
Video thumbnail
आता मोठ्या मोठ्या कंपन्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांना नोकरी देण्यासाठी वणीतील आयटीआय मध्ये येतात...
06:15
Video thumbnail
वणी का नाम दुनिया में रोशन किया! विधी बाजोरिया बनीं पहली महिला पायलट | Success Story...
10:09
Video thumbnail
वणीतील गोंडकालीन ऐतिहासिक विहिरीचे रहस्य! खजुराहो सारख्या दुर्मिळ प्रतिमा | Wani History...
18:23
Video thumbnail
वणीतील रहस्यमय विष्णू स्तंभ!भगवान विष्णूंच्या अवतारांचे अद्भुत शिल्पदर्शन,एक फेरी व चारधामाचे पुण्य.
12:46
Video thumbnail
टीम एबीवीपीची ऐतिहासिक वारसा स्वच्छता मोहीम शेवटच्या टप्प्यात,जाणून घ्या जेन जी चा परिचय...
02:29
Video thumbnail
४०० वर्षे जुनी असलेली वणीची ऐतिहासिक संपदा, विडिओ मध्ये बघा पूर्ण माहिती...
02:27
Video thumbnail
जलशुद्धीकरण केंद्राच्या नावाखाली वणी नगरपरिषद करणार वृक्षांच्या कत्तली...
02:44
Video thumbnail
वेकोलीचे खोटे आश्वासन शेतकऱ्यांच्या जीवावर, न्याय मिळवून देण्यासाठी विजय पिदुरकर मैदानात...
03:33
Video thumbnail
जय श्री श्याम,स्थापना एक वर्ष और ब्यावला उत्सव, श्याम के भक्तों की दर्शनों के लिए उमड पडी भीड...
18:37
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए