Homeक्राइमटिळक नगर परिसरात जैताई मंदिराजवळ कुकरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही!

टिळक नगर परिसरात जैताई मंदिराजवळ कुकरचा भीषण स्फोट; सुदैवाने जीवितहानी नाही!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी येथील टिळक नगर परिसरातील जैताई मंदिराच्या जवळ एका घराच्या अंगणात कुकरचा प्रचंड मोठा स्फोट झाल्याची भयंकर घटना घडली आहे. सुदैवाने घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य घरात असल्याने आणि दुर्घटना अंगणात घडल्याने मोठी जीवितहानी टळली असून कोणीही जखमी झालेले नाही.

नेमकी दुर्घटना कशी घडली?

जैताई मंदिराच्या जवळ पूजा म्यानावार यांचे गुपचुपचे (पाणीपुरीचे) दुकान आहे. नेहमीप्रमाणे व्यवसायासाठी अंगणात शेगडीवर कुकरमध्ये बटाटे (आलू) उकळण्यासाठी ठेवण्यात आले होते. शेगडीला बाहेरचा वारा लागू नये म्हणून कुकर आणि शेगडीच्या आजूबाजूला सुरक्षिततेसाठी पाट्या ठेवण्यात आल्या होत्या.

परंतु, अचानक हवेचा वेग वाढला आणि एक जोरदार वारा आला. या वाऱ्याच्या वेगामुळे शेजारी ठेवलेली पाटी थेट शेगडीवरील कुकरवर जाऊन पडली. पाटी कुकरवर अशा पद्धतीने पडली की, ज्यामुळे कुकरची मुख्य शिट्टी दाबली गेली आणि आतील वाफ (Steam) बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला. वाफ कोंडल्यामुळे कुकरमध्ये प्रचंड प्रेशर निर्माण झाले आणि काही वेळातच त्याचा अत्यंत भयंकर स्फोट झाला.

दुर्घटना भयंकर, पण सुदैवाने परिणाम नगण्य!

हा स्फोट इतका भीषण आणि त्याचा आवाज एवढा प्रचंड होता की, संपूर्ण परिसरात क्षणार्धात भीतीचे वातावरण पसरले. स्फोटानंतर घटनास्थळी अत्यंत विदारक दृश्य पाहायला मिळत होते. कुकरचे अक्षरशः तुकडे-तुकडे झाले होते; तर कुकर, त्यातील उकळणारे आलू आणि शेगडी सर्व काही परिसरात दूरवर विखुरलेल्या अवस्थेत पडून होते.

सुरुवातीला आजूबाजूच्या नागरिकांना गॅस सिलेंडरचाच मोठा ब्लास्ट झाला की काय, अशी शंका आली. आवाजामुळे घाबरलेले लोक तातडीने घराबाहेर आले आणि घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. दुर्घटना पाहता ती अत्यंत भयंकर आणि मोठी होती, परंतु नशिबाने त्याचे परिणाम अगदी नगण्य राहिले.

अंगणात घटना घडल्याने सर्व सुरक्षित…

या अपघातातील सर्वात दिलासादायक बाब म्हणजे ही संपूर्ण घटना घराच्या बाहेर अंगणात घडली. स्फोटाच्या वेळी घरातील सर्व सदस्य सुरक्षितपणे घराच्या आत होते. त्यामुळे एवढा मोठा आणि भयानक स्फोट होऊन, कुकर आणि वस्तूंच्या चिंधड्या उडूनही कुटुंबातील कोणत्याही सदस्याला किंवा इतर नागरिकाला साधी दुखापतही झालेली नाही. केवळ नशिबाने आज एक फार मोठा अनर्थ टळला आहे.

गृहीणींनो काळजी घ्यावी…

घरात स्वयंपाक करताना काळजी घेणं खूप आवश्यक आहे, सिलेंडर, कुकर, यांची वेळोवेळी तपासणी करणं गरजेचं आहे, सावध रहा दुर्घटना टाळा. 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
श्री गुरुनानक जयंती लंगर,जाती ,धर्म ,संप्रदाय और पंथ से परे सब एक समान,सिंधी पंचायत गुरुद्वारा वणी।
02:12
Video thumbnail
🚩 एक अद्भुत अनुभव: सावंगी जुनी येथील जगदंबा मातेचा त्रिदिवसीय उत्सव ,Marathi Vlog & Ground Report. 🚩
08:17
Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए