Homeक्राइम'एमडी' ड्रग्ज माफियांवर पोलिसांची स्ट्राईक सुरूच! दोघांनंतर तिसरा मुख्य सूत्रधारही जाळ्यात!

‘एमडी’ ड्रग्ज माफियांवर पोलिसांची स्ट्राईक सुरूच! दोघांनंतर तिसरा मुख्य सूत्रधारही जाळ्यात!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

## **वणीत ‘एमडी’ ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश; दोन आरोपींच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून तिसरा मुख्य आरोपी गळाला!**

 * **वणी पोलिसांची धडक कारवाई: आणखी ६७,७८० रुपयांच्या मुद्देमालासह वरोऱ्याचा तरुण जेरबंद**

जिल्ह्यात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आणि अंमली पदार्थांच्या छुप्या विक्रीला चाप लावण्यासाठी यवतमाळ पोलीस दलाने कंबर कसली आहे. वणी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने आधी दोन तरुणांना अटक केल्यानंतर, आता त्यांच्या पोलीस कोठडीतील कसून चौकशीत या गुन्ह्याचे धागेदोरे वरोऱ्यापर्यंत पोहोचले आहेत. आरोपींच्या कबुलीवरून पोलिसांनी वणी शहरातच सापळा रचून तिसऱ्या मुख्य आरोपीला अंमली पदार्थांसह अटक केली आहे.

### **अशी मिळाली तिसऱ्या आरोपीची माहिती**

वणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४७९/2026 (कलम ८(सी), २१(बी), २९ एन.डी.पी.एस. कायदा) अंतर्गत आधी अटक करण्यात आलेले आरोपी **सौरभ दिनेश खैरे** आणि **प्रथमेश विनोद गुंडेवार** हे पोलीस कोठडीत होते. दि. १६/०६/२०२६ रोजी वणी पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, या ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात वरोऱ्याच्या एका तरुणाचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ आपली गोपनीय बातमीदार यंत्रणा सक्रिय केली. तो संशयित आरोपी वणी शहरातच वावरत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी घेराबंदी करून त्याला ताब्यात घेतले.

### **वरोऱ्याच्या आरोपीकडून ‘एमडी’ जप्त**

ताब्यात घेतलेल्या आरोपीची कायदेशीर अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे **७.५४ मिली** वजनाचा **’एमडी’ (Mephedrone Drugs)** हा अत्यंत घातक अंमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

 * **७.५४ मिली एम.डी. ड्रग्ज:** किंमत रु. ५२,७८०/-

 * **अँड्रॉइड मोबाईल:** किंमत रु. १५,०००/-

 * **एकूण जप्त मुद्देमाल:** रु. ६७,७८०/-

**अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या आरोपीचे नाव:**

 * **अक्षय उर्फ गोलू माधव पेचे** (वय २७ वर्ष, रा. वरोरा, जि. चंद्रपूर)

### **पार्श्वभूमी: आधी ‘या’ दोन आरोपींना करण्यात आली होती अटक**

यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, वणी येथील ‘एसपीएम’ शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या नगर परिषद शाळा क्र. ३ समोरील मोकळ्या मैदानावर सापळा रचण्यात आला होता. तिथे निळ्या रंगाच्या मोपेड दुचाकीवरून (क्र. MH 29 CD 5776) ड्रग्ज विकण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना रंगेहात पकडण्यात आले होते.

त्यांच्याकडून ५ ग्रॅम ९१ मिलिग्रॅम ‘एमडी’ (Methadone), मोपेड गाडी आणि रोख रकमेसह एकूण **१,६३,०७० रुपयांचा** मुद्देमाल आधीच जप्त करण्यात आला होता.

 * **सौरभ दिनेश खैरे** (वय २५ वर्ष, रा. तेली फैल, वणी)

 * **प्रथमेश विनोद गुंडेवार** (वय २० वर्ष, रा. भाग्यशाली नगर, दीपक चौपाटी, वणी)

या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन्ही कारवाया मिळून लाखो रुपयांचे ड्रग्ज नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस पथकाची धडक कामगिरी..

ही यशस्वी कामगिरी यवतमाळचे पोलीस अधीक्षक **श्री. कुमार चिंता**, अपर पोलीस अधीक्षक **श्री. अशोक थोरात**, आणि वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) **श्री. सुरेश दळवे** यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सदर कारवाई वणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलीस निरीक्षक **भानुदास पिदुरकर** यांच्या नेतृत्वात, पोउपनि सुयोग महापुरे, पोउपनि साजीद सय्यद, तसेच पोलीस अंमलदार गणेश मेश्राम, मोनेश्वर खंडारे, नंदकुमार पुप्पलवार, निलेश आडे आणि शाम राठोड यांनी केली आहे. या धडक कारवाईमुळे वणीतील ड्रग्ज माफियांचे धाबे दणाणले आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
🚩 एक अद्भुत अनुभव: सावंगी जुनी येथील जगदंबा मातेचा त्रिदिवसीय उत्सव ,Marathi Vlog & Ground Report. 🚩
08:17
Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए