Homeक्राइमवणीतील अनधिकृत थांबे व वाहतूक कोंडीविरोधात 'लढा संघटना' आक्रमक; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना...

वणीतील अनधिकृत थांबे व वाहतूक कोंडीविरोधात ‘लढा संघटना’ आक्रमक; उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सूनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

वणी शहरात दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या वाहतूक समस्येवर लढा संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरातील अनियंत्रित वाहतूक, प्रमुख चौकांमधील बेकायदेशीर पार्किंग आणि अनधिकृत वाहन थांबे तात्काळ हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यात यावी, या मागणीसाठी संघटनेच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) यांना नुकतेच एक निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात वणी शहर आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रमुख चौकांमध्ये कोंडी, नागरिकांना मनस्ताप…

लढा संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, वणी शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर आणि प्रमुख चौकांमध्ये प्रवासी ऑटो, ट्रॅव्हल्स तसेच इतर वाहनांनी स्वतःचे अनधिकृत थांबे तयार केले आहेत. रस्त्याच्या मधोमध किंवा चौकातच वाहने उभी राहत असल्याने दररोज तासनतास वाहतूक कोंडी होत आहे. याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शासकीय कर्मचाऱ्यांना बसत आहे. वाहतूक नियमांचा फज्जा उडाल्यामुळे शहरात अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.

लढा संघटनेच्या प्रमुख मागण्या…

वाहतूक कोंडीतून वणीकरांची सुटका करण्यासाठी संघटनेने प्रशासनासमोर खालील मागण्या ठेवल्या आहेत:

 थांबे हटवणे…

शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवरील आणि चौकांमधील बेकायदेशीर वाहन थांबे त्वरित निष्कासित करावेत.

 नियमित पोलीस बंदोबस्त…

वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी मुख्य चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची कायमस्वरूपी नियुक्ती व्हावी.

 दंडात्मक कारवाई…

नो-पार्किंग क्षेत्रात किंवा नियमांचे उल्लंघन करून वाहने उभी करणाऱ्यांवर कडक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.

 नियोजित वाहनतळ…

ऑटो आणि इतर प्रवासी वाहनांसाठी प्रशासनाने अधिकृत थांबे (Stands) निश्चित करावेत आणि तिथे तसे मार्गदर्शक फलक लावावेत.

 विशेष मोहीम व तंत्रज्ञान…

शहरात विशेष वाहतूक सुधारणा मोहीम राबवावी, तसेच प्रमुख चौकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून नजर ठेवून नियंत्रण व्यवस्था मजबूत करावी.

आंदोलनाचा इशारा..

वणी शहरातील नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक शांतता लक्षात घेता पोलीस प्रशासनाने या मागण्यांवर तात्काळ पावले उचलावीत. यावर योग्य कारवाई न झाल्यास लढा संघटनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन सादर करतेवेळी लढा संघटनेचे प्रमुख प्रवीण खानझोडे यांच्यासह आकाश दुबे, जफर खान, अशोक अंकतवार, सुभाष लसंत्ते, तानबाजी कडू आणि संघटनेचे इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
🚩 एक अद्भुत अनुभव: सावंगी जुनी येथील जगदंबा मातेचा त्रिदिवसीय उत्सव ,Marathi Vlog & Ground Report. 🚩
08:17
Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए