Homeक्राइमचिखलगाव लालपुलिया परिसरात बेकायदेशीर अवजड वाहनांचे पार्किंग; ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

चिखलगाव लालपुलिया परिसरात बेकायदेशीर अवजड वाहनांचे पार्किंग; ग्रामस्थांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

चिखलगाव ग्रामपंचायत हद्दीतील लालपुलिया परिसरात रस्त्यावर तासनतास उभ्या राहणाऱ्या अवजड ट्रकांमुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होत असून अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. याप्रकरणी वाहतूक विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (RTO) तातडीने हस्तक्षेप करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत मनोज नवले, निलेश सोनटक्के यांच्यासह चिखलगाव येथील ग्रामस्थांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (यवतमाळ) व उपविभागीय पोलिस अधिकारी (वणी) यांना निवेदन सादर केले आहे.

निवेदनातील मुख्य मुद्दे व मागण्या:

नागरिकांची दैनंदिन घुसमट: रस्त्याच्या दुतर्फा अथवा मधोमध उभ्या राहणाऱ्या ट्रकांमुळे शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी आणि इतर वाहनधारकांना ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

अपघातांचे सत्र व जीवघेणा प्रवास: अनेक ठिकाणी दुभाजकांचा (डिव्हायडर) वापर टाळून अवजड वाहने उभी केली जातात. त्यामुळे वळणावर समोरून येणारे वाहन न दिसल्याने अपघात घडत आहेत. नोव्हेंबर २०२५ मध्ये याच निष्काळजीपणामुळे चिखलगाव येथील ‘मेधधूत’ परिसरातील एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली आहे.

प्रशासकीय उदासीनता: या समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.

८ दिवसांचा अल्टिमेटम:

प्रशासनाने येत्या ८ दिवसांच्या आत रस्त्यावरील हे बेकायदेशीर ट्रक हटवून संबंधित ट्रान्सपोर्ट धारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. मुदतीत तोडगा न निघाल्यास रस्ता रोको किंवा जनआंदोलन करण्यात येईल. या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार किंवा अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी वाहतूक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाची राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

या निवेदनावर मनोज नवले, निलेश सोनटक्के, अमित संते, रवींद्र राऊत, धनंजय भोयर, गणपत खांडेकर आणि तुषार कांबळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
धक्कादायक! वर्ग सुरू असताना शाळेची भिंत कोसळली,चिमुकल्यांचा जीव धोक्यात, प्रशासनाचे दुर्लक्ष?
07:06
Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए