HomeAgroवणीत एलसीबीचा मोठा छापा: ५ हॉटेलांची तपासणी, तिघांत आढळले ६६ किलो गोवंशीय...

वणीत एलसीबीचा मोठा छापा: ५ हॉटेलांची तपासणी, तिघांत आढळले ६६ किलो गोवंशीय मांस; हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

शहरातील हॉटेल आणि बिर्याणी सेंटरच्या आडून सुरू असलेल्या अवैध गोवंशीय मांस विक्रीवर यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई केली आहे। १८ ऑक्टोबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी वणी शहरातील एकूण पाच हॉटेलांमध्ये एकाच वेळी अचानक छापे टाकून झडती घेतली। त्यापैकी तीन हॉटेलांमध्ये सुमारे १९ हजार ८०० रुपयांचे ६६ किलो गोवंशीय मांस जप्त करण्यात आले असून तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कुठे काय कारवाई झाली?

१. हॉटेल मदिना (सुजाता टॉकीजसमोर, वणी):

सकाळी अंदाजे ९:३० वाजता पंचांसमक्ष व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला। यावेळी हॉटेलच्या फ्रिजमधून १८ किलो कच्चे आणि टोपलीमधून २० किलो असे एकूण ३८ किलो गोवंशीय मांस (किंमत अंदाजे ११,४०० रु.) जप्त करण्यात आले। याप्रकरणी चालक हबीब खान बिस्मिल्ला खान (वय ५३, रा. साई नगरी, वणी) याच्यावर कारवाई करण्यात आली आहे।  

२. सुलतान बिर्याणी हॉटेल (एकता नगर, वणी):

दुपारी १२:३० वाजता एकता नगर येथील या हॉटेलवर छापा टाकण्यात आला। किचनमधून ५ किलो कच्चे आणि कुकरमधून ४ किलो शिजवलेले असे एकूण ९ किलो गोवंशीय मांस (किंमत अंदाजे २,७०० रु.) हस्तगत करण्यात आले। चालक मोहम्मद सिद्दीक हाजी हबीब रंगरेज (वय ४७, रा. विराणी टॉकीजजवळ, वणी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला गेला आहे।  

३. ताज बिर्याणी हॉटेल (एकता नगर, वणी):

पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके यांच्या फिर्यादीनुसार येथे कारवाई करण्यात आली। या ठिकाणाहून १९ किलो संशयित गोवंशीय मांस (किंमत अंदाजे ५,७०० रु.) जप्त करण्यात आले। हॉटेल चालक साजिद खान शमशेर खान (वय ४९, रा. मदिना मस्जिदजवळ, वणी) याच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे।  

तपासाची व्याप्ती आणि पार्श्वभूमी…

कारवाईदरम्यान जप्त मांसाचे नमुने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत प्रयोगशाळा तपासणीसाठी (Lab Testing) पाठवण्यात आले असून, नाशवंत मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी वणी नगर परिषदेचे सहकार्य घेण्यात आले आहे. 

वणी परिसरात अशा घटना सातत्याने समोर येत आहेत. आठवडाभरापूर्वी गांधी चौकात ६० किलो तर पांढरकवडा येथे तीन घरांमधून सुमारे ९०० किलो मांस जप्त करण्यात आले होते. पांढरकवडा व चंद्रपूर मार्गे हा पुरवठा शहरात पोहोचत असल्याची चर्चा असून, या रॅकेटचे मुख्य सूत्रधार कोण आणि वाहतुकीचे मार्ग कोणते, याचा मुळापासून छडा लावण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.

पोलीस पथकाची कामगिरी…सदर यशस्वी कारवाई यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। पथकात सपोनि दत्ता पेंडकर, गजानन राजमल्लु, पोउपनि धनराज हाके, सागर इंगळे, हवालदार सुनील खंडागळे, अजय डोळे, सुधीर पांडे, सुधीर पिदुरकर, अंमलदार किशोर आडे, मिलींद दरेकर, रजनीकांत मडावी, सुनील पैठणे, आकाश सुर्यवंशी, देवेंद्र होते आणि चालक नरेश राउत यांचा सहभाग होता।  

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
🚩 एक अद्भुत अनुभव: सावंगी जुनी येथील जगदंबा मातेचा त्रिदिवसीय उत्सव ,Marathi Vlog & Ground Report. 🚩
08:17
Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए