HomeAgroवणी परिसरातील कोळसा डेपो व प्रदूषणाविरोधात संताप; ७ दिवसांत तोडगा न निघाल्यास...

वणी परिसरातील कोळसा डेपो व प्रदूषणाविरोधात संताप; ७ दिवसांत तोडगा न निघाल्यास १३ नोव्हेंबरला राजूर रिंग रोडवर चक्काजामचा इशारा,लढा संघटनेचा एल्गार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत सिटी हब मिडिया वणी…

वणी तालुक्यातील सोमनाळा, निंबाळा, राजूर ते चिखलगाव परिसरातील वाढत्या प्रदूषणामुळे जनजीवन आणि आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाच्या वेळकाढू व दुर्लक्षित कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, ‘लढा संघटना’ आणि बाधित ग्रामस्थांनी प्रशासनाला निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या सात दिवसांत संयुक्त बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा न काढल्यास येत्या १३ नोव्हेंबर रोजी राजूर रिंग रोडवर तीव्र चक्काजाम आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.प्रदूषणामुळे आरोग्य धोक्यात, ओव्हरलोड वाहनांमुळे रस्ते खड्ड्यात…

परिसरात बेकायदेशीररीत्या सुरू असलेले कोळसा डेपो, कोल वॉशरी, डोलोमाईट उद्योग आणि रेल्वे रॅक पॉईंटमुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. सोमनाळा, निंबाळा, झरपट, राजूर, भांडेवाडा, सोनापूर, बोदाड, पळसोनी, मेघदूत, कळमना आणि चिखलगाव परिसरातील नागरिक श्वसनाचे आजार व इतर आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त आहेत. त्यातच दिवस-रात्र धावणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांमुळे राजूर रिंग रोडची अक्षरशः चाळणी झाली असून रस्त्याची दुरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहे.

वारंवार बैठका, पण प्रत्यक्ष कारवाई शून्य…

नागरिकांनी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली असून उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकारी व डेपोचालकांच्या बैठकाही पार पडल्या. मात्र, ठोस कारवाईऐवजी केवळ बैठकांचा फार्स सुरू असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासन जाणूनबुजून टाळाटाळ करत कोळसा व्यावसायिक व उद्योजकांना पाठीशी घालत असल्याचा संतापही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

प्रमुख मागण्या:

सोमनाळा/निंबाळा ते चिखलगाव चौफुली दरम्यान महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघातील सर्व अनधिकृत कोल डेपो तत्काळ सील करावेत.

राजूर रिंग रोड परिसरातील कोळसा साठे व डेपो बंद करण्यात यावेत.

रुख्माई कोल वॉशरी, विकास कोल, रॅक पॉईंट आणि डोलोमाईट कारखान्यांसाठी होणारी अनधिकृत ओव्हरलोड वाहतूक पूर्णपणे रोखावी.

कळमना येथील आंदोलनाच्या धर्तीवर, संबंधित कंपन्या व डेपोचालकांच्या खर्चातून राजूर रिंग रोडचे तात्काळ डांबरीकरण/बांधकाम करून द्यावे.

गेल्या १५-२० वर्षांत या उद्योगांकडून पर्यावरण रक्षण आणि आरोग्य शिबिरांबाबत कोणती पावले उचलली, याची सखोल चौकशी करून प्रशासनाने केलेल्या कारवाईचा लेखी अहवाल सादर करावा.

या निवेदनावर ‘लढा संघटना’ वणी विधानसभा प्रमुख प्रवीण खानझोडे यांच्यासह ॲड. रूपेश ठाकरे, राहुल क्षीरसागर, मंगेश येटे, पंकज मोरे, राहुल कुत्तरमरे, मनोज ढेंगळे, शिवाजी मोरे, ईमामुल हुसेन, अतुल चांदेकर, भगवान मोहिते, धनंजय भोयर, रोशन गारपेलीवार यांच्यासह बाधित गावातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास १३ नोव्हेंबरचा चक्काजाम निर्णायक ठरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Video thumbnail
वणी में गूंजा इंसानियत और भाईचारे का संदेश, सूफी संत ने कहा—“मजहब से पहले इंसानियत जरूरी”
04:39
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए