सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…
आकाशातून कोसळणाऱ्या रिमझिम धारा आणि चेहऱ्यावर समाज परिवर्तनाचा नवा उत्साह… अशा भारलेल्या वातावरणात वणीकरांनी आरोग्यदायी जीवनशैली आणि व्यसनमुक्तीचा नवा अध्याय लिहिला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती तसेच माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने शुक्रवारी २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ‘नमो युवा रन – नशामुक्त भारत मॅरेथॉन’चे शानदार आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक (टिळक चौक) येथून सकाळी ६:३० वाजता सुरू झालेल्या या दौडीत सुमारे २५० तरुणी आणि तरुणांनी हिरिरीने धावत संपूर्ण शहरात व्यसनमुक्तीचा जागर केला.

मान्यवरांच्या हस्ते गौरव…
स्पर्धेच्या यशस्वी सांगतेनंतर विविध वयोगटांतील गुणवंत धावपटूंना माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार आणि व्यासपीठावरील अतिथींच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह तसेच प्रशस्तिपत्र बहाल करून गौरविण्यात आले.
विविध गटांतील गुणवंत खेळाडू
१६ वर्षांखालील मुलांचा गट:
प्रथम: शिवम भोलेनाथ ओझा
द्वितीय: हसन नूर सय्यद
तृतीय: मोहम्मद फयाज अली
चतुर्थ: वेद राजू देठे
१६ वर्षांखालील मुलींचा गट:
प्रथम: नव्वा श्रीराम पिदुरकर
द्वितीय: प्रणाली प्रकाश ठाकरे
तृतीय: हिमांशी प्रेमदेव कावडे
चतुर्थ: तनुश्री संजय टिकले
१६ वर्षांवरील मुलांचा खुला गट:
प्रथम: पियुष संतोष पदलमवार
द्वितीय: आकाश श्रावण ठमके
तृतीय: क्रिश सतीश मिस्त्री
चतुर्थ: सौरभ अरुण दरणे
१६ वर्षांवरील मुलींचा खुला गट:
प्रथम: गौरी रामदास पांभूळकर
द्वितीय: अल्फिया शफी शेख
तृतीय: शास्वती कवडू बुरडकर
चतुर्थ: खुशबू मारोती निखाडे
प्रशासकीय यंत्रणांचे मोलाचे पाठबळ…
कार्यक्रमाच्या सुनियोजित आयोजनात प्रा. दिलीप मालेकर सर, महेश पहापळे, बंटी शेंडे, संतोष बेलेकर सर यांचे विशेष योगदान राहिले. सोबतच वणी पोलीस स्टेशन, शहर वाहतूक शाखा, ग्रामीण रुग्णालय, वणी नगर परिषद आणि शिवशाही ॲम्ब्युलन्स सेवा यांनी तत्पर यंत्रणा पुरवून सहकार्य केले. भाजप वणी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशासाठी मेहनत घेतली.

समारोपीय बक्षीस वितरण सोहळ्याचे सूत्रसंचालन राजू गव्हाणे यांनी शैलीदार शब्दांत सांभाळले, तर भाजप वणी शहर अध्यक्ष ॲड. निलेश माया महादेव चौधरी यांनी सर्व स्पर्धक, मार्गदर्शक व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

























