HomeAgroरानडुकरांमुळे अपघात अन् तक्रारीवरून वाद; संतापाच्या भरात वेकोलि सुरक्षारक्षकाचा खून ,रात्रीच तक्रार...

रानडुकरांमुळे अपघात अन् तक्रारीवरून वाद; संतापाच्या भरात वेकोलि सुरक्षारक्षकाचा खून ,रात्रीच तक्रार नोंदवण्याच्या हट्टावरून घडला थरार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

कोलारपिंपरी परिसरातील प्रगती नगर कॉलनीत वेकोलिच्या सुरक्षा रक्षकाचा खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) तत्परतेने शोध घेत अवघ्या २४ तासांच्या आत गजाआड केले आहे. रानडुकरांमुळे झालेल्या अपघाताची तक्रार रात्रीच नोंदवून घेण्याच्या हट्टापायी झालेल्या वादातून ही निर्घृण हत्या घडल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.  नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, कोलारपिंपरी येथील क्षेत्रीय प्रबंधक कार्यालयात ओमप्रकाश हिरा प्रसाद (वय ४५) हे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. ३१ ऑक्टोबर २०२६ च्या रात्री कार्यालय परिसरात अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जीवघेणे वार करून त्यांची हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला होता.  

गोपनीय माहितीवरून आरोपी गजाआड… यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत असताना, घटनेच्या वेळी अंचल मोहन उईके (वय २८, रा. प्रगती नगर कॉलनी, कोलारपिंपरी, वणी) हा घटनास्थळी हजर असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून २ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्याला ताब्यात घेतले.  

तक्रारीवरून घातला वाद अन् घेतला जीव… पोलिसांनी अंचल उईके याच्याकडे सखोल विचारपूस केली असता गुन्ह्याची धक्कादायक पार्श्वभूमी उघड झाली. घटनेच्या रात्री कॉलनी परिसरात रानडुकरांचा कळप अचानक समोर आल्याने आरोपी दुचाकीवरून घसरून पडला होता. या प्रकाराची तक्रार वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करण्यासाठी तो रात्री पावणेअकराच्या सुमारास कार्यालयात पोहोचला. ड्युटीवर तैनात असलेले सुरक्षारक्षक ओमप्रकाश प्रसाद यांनी त्याला तक्रार सकाळी कार्यालयात येऊन देण्यास सांगितले. मात्र, ‘माझी तक्रार आत्ताच्या आत्ताच नोंदवून घ्या,’ असा हट्ट धरत आरोपीने वाद घातला. हा वाद विकोपाला जाऊन त्याने संतापाच्या भरात सुरक्षारक्षक प्रसाद यांच्या डोक्यावर व तोंडावर गंभीर वार करून त्यांना जागीच ठार केले.  

पोलीस पथकाची कामगिरी… सदरची धडक कारवाई यवतमाळचे मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (उपविभाग वणी) श्री. सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.  

स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अधिकारी व अंमलदार:

पोलीस निरीक्षक: सतिष चवरे  

सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि): दत्ता पेंडकर, गजानन राजमलु…

पोलीस उपनिरीक्षक (पोउपनि): धनराज हाके, शिवशंकर कायंदे, सागर इंगळे…. 

पोलीस हवालदार (पोहवा): सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुधीर पिदूरकर, सोहेल मिर्झा, मिथुन जाधव, योगेश डगवार, रुपेश पाली, सुनिल मेश्राम…

पोलीस नाईक (पोना): किशोर आडे, मिलीन्द दरेकर, सचिन मलाये…  

पोलीस शिपाई (पोकॉ): महेश वाकोडे, रजनीकांत मडावी, सलमान शेख, दिगांबर पिलावन, पवन ढवळे, आकाश सुर्यवंशी…

चालक सफौ / अंमलदार: नरेश राऊत, जितेन्द्र चौधरी…

सदर गुन्ह्याचा पुढील तपास वणी पोलीस करत आहेत. 

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
🚩 एक अद्भुत अनुभव: सावंगी जुनी येथील जगदंबा मातेचा त्रिदिवसीय उत्सव ,Marathi Vlog & Ground Report. 🚩
08:17
Video thumbnail
भगवान श्री रंगनाथ स्वामींचा वैकुंठ महोत्सव सोहळा वणी,जिल्हा यवतमाल ,दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा…
02:23
Video thumbnail
वणीत २३ नोव्हेंबरला ‘श्री वैकुण्ठ महोत्सव’; महाअभिषेक, दीपोत्सव आणि छप्पन भोगाचे आयोजन…
02:45
Video thumbnail
शास्त्रीनगर वणी येथील संतोषी माता, ३८ वर्षांची परंपरा...
02:26
Video thumbnail
उकणीत भूमिपुत्रांचा एल्गार!परप्रांतीयांना प्राधान्य का? संजय खाडे यांच्या समर्थनाने प्रशासन नरमले...
07:20
Video thumbnail
वणीत दुष्काळात तेरावा महिना जागोजागी पाण्याचे लिकेज,रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी…
01:19
Video thumbnail
भालर रोड वर कारचा अपघात,सुदैवाने जीवितहानी नाही…
01:18
Video thumbnail
वणी- राजूर रिंग रोडवर ग्रामस्थांचा रास्ता रोको;अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित.
03:11
Video thumbnail
लालपुलिया संघर्ष समितीचे चिखलगाव ग्रामपंचायतीवर गंभीर आरोप…
05:33
Video thumbnail
लालपुलिया कोल डेपो वर फक्त आश्वासनच मिळणार की कारवाई ही होणार???
02:48
Video thumbnail
निर्गुडानदी कोरडी पडल्याने रब्बी पिके व पशुधन धोक्यात;नवरगाव धरणाचे पाणी सोडा विजय पिदुरकरांची मागणी
02:01
Video thumbnail
अमरावती शिक्षक मतदारसंघात दिलीप कडूंचा विजय १००% निश्चित — आमदार सुधाकर अडबाले...
06:56
Video thumbnail
एक एक रूपया जमा करून करण्यात आला जैताई मंदिराचा जीर्णोद्धार...
02:36
Video thumbnail
जय माता दी,वणीची जागृत जैताई माता,मूर्तीचं रहस्य काय आहे? बघा सविस्तर माहिती या वीडियो मध्ये…
02:33
Video thumbnail
भारत के इस पायलट की बहादुरी को दुनिया कर रही सलाम...
02:11
Video thumbnail
ओटीपी मागून सिलेंडरचा काळाबाजार??!
02:16
Video thumbnail
Happy Birthday Modiji,लेकिन कुशल उपदेश बहुतेरे…
01:30
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया,जय भवानी जय शिवाजी…चेतनआगलावे यांच्या घरी पावनखिंडीतील लढाईंचा प्रेरणादायी देखावा
02:35
Video thumbnail
गणपती बाप्पा मोरया ,वणीतील नृत्य शिक्षक विकास घाटोळे यांच्या घरी सुंदर सजावट…
02:20
Video thumbnail
जय श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल ,वणीतील सर्वात जुने कृष्ण मंदिर, डॉ तुगनायत यांच्या दवाखान्याजवळ वणी
02:02
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए