वणी (प्रतिनिधी) – आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, वणी शाखेच्या वतीने टिळक स्मारकाची स्वच्छता करण्यात आली आणि टिळकांच्या पुतळ्याला माल्यार्पण करूनअभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमात नगरमंत्री आयुषी फुलेवार, नगर उपाध्यक्ष चैतन्य तुरविले, जिल्हा संयोजक चेतन राऊत, जिल्हासंघटनमंत्री वैभव वाघमारे यांच्यासह समय थोरात, शुभम दहिवलकर, वेदांत भोयर, मोनिका डुकरे, श्रेया वाडेकर, सुहानी जुमनाके, मानसी सहारे यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमातून स्वच्छतेचा आणि राष्ट्रपुरुषांप्रती आदर व्यक्त करण्याचा संदेश देण्यातआला.
—

























