Homeमहाराष्ट्रवणी आगाराचा मनमानी कारभार; विद्यार्थ्यांच्या बसफेऱ्या सुरळीत न झाल्यास अभाविप रस्त्यावर उतरणार!

वणी आगाराचा मनमानी कारभार; विद्यार्थ्यांच्या बसफेऱ्या सुरळीत न झाल्यास अभाविप रस्त्यावर उतरणार!

-

[gtranslate]

Advertisementspot_img

सुनिल तुगनायत, सिटी हब मिडिया वणी…

ग्रामीण भागातून वणी शहरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे होणारी परवड थांबण्याचे नाव घेत नाहीये. बसेसच्या अनिश्चित वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान रोखण्यासाठी आता अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आक्रमक झाली असून, आगार प्रशासनाला समस्या निवारणासाठी ७२ तासांचा (३ दिवस) अल्टिमेटम दिला आहे.

परिसरातील खेड्यापाड्यांतून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या मुला-मुलींना दररोज वेळेवर गाड्या न मिळणे, शाळा-महाविद्यालयांच्या वेळेत बसफेऱ्या नसणे आणि सुटल्यानंतर तासनतास बसस्थानकावर ताटकळत राहावे लागणे अशा गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी अभाविपच्या शिष्टमंडळाने थेट वणी आगारात धडक दिली.

यावेळी आगार व्यवस्थापक यवतमाळ दौऱ्यावर असल्याने पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी थेट फोनवरून संपर्क साधत परिस्थितीची भीषणता मांडली. त्यानंतर आगारातील कर्मचाऱ्यांकडे मागण्यांचे निवेदन सोपवण्यात आले.

प्रमुख मागण्या व आंदोलनाचा इशारा:

शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळेनुसार ग्रामीण मार्गांवर पुरेशा व नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.

प्रशासनाने ३ दिवसांच्या आत ठोस कृती आराखडा जाहीर करावा.

वेळेत सकारात्मक पाऊल न उचलल्यास चौथ्या दिवशी वणी बसस्थानक परिसरात तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल.

यावेळी नयन क्षीरसागर, अंकित भालेराव, शितेश गोवारकर यांच्यासह अभाविपचे कार्यकर्ते आणि त्रस्त विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी होणारा खेळ खपवून घेतला जाणार नाही; प्रशासनाने तात्काळ मार्ग न काढल्यास आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी आगाराची असेल,” असा सज्जड दम यावेळी देण्यात आला.

Advertisementspot_img

youtube व्हिडिओस

Video thumbnail
बच्चू कडूंचा रुद्र अवतार! WCL अधिकाऱ्याला थेट सुनावलं; “२० हजार लोगों के साथ ऑफिस में घुसुंगा!”
02:09
Video thumbnail
Wani Tiranga Rally 2026 LIVE | वणी शहर में जनसैलाब, भारत माता की जय के नारों से देशभक्ति का माहौल..
21:59
Video thumbnail
वणीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावर बच्चू कडू आक्रमक; वेकोलीची कोळसा वाहतूक रोखण्याचा इशारा! 🚨
19:25
Video thumbnail
BHMS, CCMP आणि MBBSवाद नको… रुग्णसेवा हवी!सर्व पॅथींनी एकत्र यावे!
09:01
Video thumbnail
जुनैद भाई तो झारखंड पहुँच गए,लेकिन कॉक्रोच कहा बिल में छिपे हैं???
01:39
Video thumbnail
झारखंड में इतना बड़ा आंदोलन, फिर भी सन्नाटा! JPSC विवाद पर पालतू मीडिया क्यों चुप?कहां है कॉकरोच???
04:09
Video thumbnail
वणी नगरपालिकेत विरोधी नगरसेवकांचे ठिया आंदोलन: उपमुख्याधिकाऱ्यांच्या कक्षावर दाव्यावरून वाद पेटला...
05:03
Video thumbnail
बेंगलारुत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ११ वे राष्ट्रीय महाअधिवेशन,विजय पिदुरकर यांच्या नेतृत्वात टीम…
02:49
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
क्या है रफी साहब के आखिरी गीत की कहानी...तू कहीं आसपास है दोस्त…
03:45
Video thumbnail
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त वणी बस स्थानकावर ६४ वृक्षांचे रोपण!
03:25
Video thumbnail
नागपुर में भव्य राष्ट्रीय अधिवेशन | "शून्य अपघात मेरी जिम्मेदारी" | सड़क सुरक्षा का महाअभियान।
14:50
Video thumbnail
"वणीत काँग्रेस आक्रमक!"सरकारला थेट इशारा, "राहुल गांधींच्या समर्थनात वणीत धरणे!"
02:54
Video thumbnail
21 July 2026
01:09
Video thumbnail
वणी में बड़ा खुलासा!जिंदा 87 वर्षीय महिला को मतदाता सूची में बताया मृत | SIR प्रक्रिया पर उठे सवाल।
05:07
Video thumbnail
वणीतील गल्लीगल्लीतून होतेय जडवाहतूक,नागरिकांच्या जीवाला होतोय मोठा धोका…
02:41
Video thumbnail
जीव जाण्याची वाट बघताय का सरकार? दिपक चौपाटी ते लालगुडा रस्ता कधी दुरुस्त होणार???
02:34
Video thumbnail
वेकोलीची मुजोरी संपली!गावकऱ्यांच्या आक्रमक आंदोलनापुढे झुकले अधिकारी,ऑन द स्पॉट मिळवलं लेखी आश्वासन!
11:20
Video thumbnail
जय हरी विठ्ठल,मामा भाच्यासह वणीतील तरूण निघाले पंढरीच्या वारीला...
02:39
Video thumbnail
पावसासाठी,सर्वांच्या सुखसमृद्धीसाठी देवीला साकडे घालण्याची पिढ्यांपासून चालत आलेली परंपरा...
02:25
Advertisementspot_img

Stay Connected

0FansLike
25,000FollowersFollow
0FollowersFollow
13,000SubscribersSubscribe
Advertisementspot_img

यह भी पढ़िए